सामरिक समतोलाची चीनला अपेक्षा

पीटीआय
बुधवार, 28 डिसेंबर 2016

बीजिंग - चीनला टप्प्यात आणणाऱ्या अण्वस्त्रवाहू अग्नी-5 क्षेपणास्त्राची काल भारताने यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आज चीनने भारतीय उपखंडांत सामारिक समतोल राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या, की भारताने घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचणीची माहिती घेत आहोत.

सुरक्षा परिषदेत अण्विकसंदर्भातील ठरावात स्पष्ट नियम असताना भारत अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र विकसित करू शकेल का? दक्षिण आशियात नेहमीच चीनने स्थैर्यावर आणि सुरक्षिततेवर भर दिला आहे, असे नमूद करत दक्षिण आशियातील देशांत शांतता नांदावी, विकास व्हावा, हीच अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.

काल भारताने अग्नी-5 क्षपेणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याने संरक्षण सिद्धतेत भर पडली आहे. या चाचणीमुळे पाच हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि आता भारताचे नाव जोडले गेले आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची क्षमता 5500 पासून 5800 किलोमीटरपर्यंत आहे. ओडिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. ही चाचणी चीन आणि पाकिस्तानसाठी धक्कादायक ठरली आहे.

ग्लोबल

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून,...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

लंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांना ब्रिटिश सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे....

बुधवार, 23 ऑगस्ट 2017