1000 मीटरवरून पडून एव्हरेस्टवीर उली स्टेकचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

यापूर्वी, 40 वर्षीय स्टेक यांनी 2012 साली ऑक्सिजनशिवाय माऊंट एव्हरेस्टची चढाई केली होती. 

नवी दिल्ली : 'स्विस मशीन' नावाने प्रसिद्ध असलेले स्वित्झर्लंडचे गिर्यारोहक उली स्टेक यांचा एव्हरेस्ट चढताना अपघाती मृत्यू झाला. बर्फाच्छित पर्वतावरून एक हजार मीटर उंचीवरून स्टेक खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. 

उली स्टेक हे नेपाळच्या हद्दीतील नुप्तसे पर्वतावरून कोसळले. स्टेक पहिल्याच पहिल्याच कॅम्पपासून दुसऱ्या कॅम्पच्या दिशेने जात होते. नेपाळच्या अधिकाऱ्यांनी आणि गिर्योरोहण संयोजक कंपनीने यासंबंधी माहिती दिली आहे. 

स्टेक हे नव्या मार्गाने ऑक्सिजनशिवाय माऊंट एव्हरेस्टची चढाई करण्याचा प्रयत्न करत होते. यापूर्वी, 40 वर्षीय स्टेक यांनी 2012 साली ऑक्सिजनशिवाय माऊंट एव्हरेस्टची चढाई केली होती. 
एव्हरेस्टच्या जवळ माऊंट नुप्तसे येथे त्यांचा मृतदेह सापडला. कोमोलांगा भागात या मोसमात चढाई करताना झालेला हा पहिलाच मृत्यू आहे, असे एव्हरेस्टवर चढाईसाठी परवानगी देणाऱ्या नेपाळच्या पर्यटन विभागाने सांगितले.