कॅनडाच्या पंतप्रधानांच्या नावावरून ठेवले सीरियातील शरणार्थ्याचे नाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडेव यांनी सीरियातील शरणार्थींना देशात राहण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे या दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला.

ओटावा - कॅनडामध्ये शरणार्थी म्हणून राहत असलेल्या सीरियातील जोडप्याने आपल्या मुलाचे नाव कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडेव यांच्या नावावरून ठेवले आहे. आता या मुलाचे नाव जस्टिन ट्रूडेव ऍडम बिलान असे असणार आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुहम्मद आणि आफरा बिलान हे जोडपे कॅनडामध्ये शरणार्थी म्हणून राहण्यास आले होते. त्यांना नाया (वय 4) आणि नेल (वय 3) ही दोन मुले आहेत. आता त्यांच्या घरी तिसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. सीरियाची राजधानी दमास्कसमधील ते रहिवाशी असून, युद्धाने या परिसराला ग्रासले असल्याने ते कॅनडामध्ये शरणार्थी म्हणून राहत आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडेव यांनी सीरियातील शरणार्थींना देशात राहण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे या दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला. बिलान यांनी म्हटले आहे, की कॅनडा हे वास्तव्यासाठी सुरक्षित आहे. या ठिकाणी कोणतेही युद्ध नाही. याठिकाणचे वातावरण पूर्णपणे वेगळे असून, चांगले आहे.