अफगाणिस्तानात ‘तालिबान’चे हल्ला सत्र

पीटीआय
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

दक्षिण व उत्तरेकडील दोन महत्त्वाच्या शहरांना केले लक्ष्य; पोलिस प्रमुखासह सात ठार

काबूल - अफगाणिस्तानातील दक्षिण आणि उत्तरेकडील महत्त्वाच्या शहरांवर तालिबानी दहशतवाद्यांनी आज दोन मोठे हल्ले चढविले असल्याचे वृत्त आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने तालिबानकडून हे हल्ले करण्यात आले असून, अफगाणिस्तानातील परस्परविरोधी दोन टोकांच्या ठिकाणांवर लक्ष्य करण्यात आले आहे. तालिबानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात पोलिसप्रमुख ठार झाला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानात इतरत्र झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत सात जण ठार झाले आहेत. 

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे ब्रुसेल्सला रवाना होण्यापूर्वी हे हल्ले करण्यात आले आहेत. ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपल्या देशाला आर्थिक मदत देण्याची विनंती घनी हे आंतरराष्ट्रीय समुदायाला करण्याची शक्‍यता आहे. उत्तरेकडील कुंदुझ शहरावर तालिबानकडून मोठा हल्ला चढविण्यात आला. त्याच वेळी दक्षिणेकडील तालिबानचा गड समजल्या जाणाऱ्या हेलमंडमध्ये एका जिल्ह्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. 

दक्षिण आणि उत्तरेकडील हल्ले हे अतिशय नियोजनबद्ध असून, त्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रधारी तालिबानी दहशतवाद्यांचा समावेश आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 
कुंदुझ शहरावर ताबा मिळविल्यानंतर सुमारे वर्षभरानंतर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. या शहरावर सर्व बाजूंनी तालिबानने हल्ला केला. मात्र, सुरक्षा दलांनी तो परतावून लावला, असे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यात पोलिस अधिकारी ठार झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. कुंदुझमधील शाळा, सरकारी कार्यालये आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. 
 
ट्रम्प यांच्यामुळे तालिबानमध्ये अस्वस्थता
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये गांभीर्याचा अभाव असून, त्यामुळे तालिबान्यांमध्ये अस्वस्थता आहे, असे एका वृत्तवाहिनीने सांगितले. ‘ट्रम्प हे भाषणातून वाटेल ते बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात कोणतेही गांभीर्य नसते, असे या वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे.

Web Title: Taliban attack on afganisthan

टॅग्स