तालिबानचा म्होरक्‍या हवाई हल्ल्यांत ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पेशावर: अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये तालिबानच्या म्होरक्‍या मुल्ला अब्दुल सलाम अखुंड ठार झाला. अफगाणिस्तानातील कुंदूझ प्रांतामध्ये अखुंड याने तालिबानचे नेतृत्व केले होते.

पेशावर: अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये तालिबानच्या म्होरक्‍या मुल्ला अब्दुल सलाम अखुंड ठार झाला. अफगाणिस्तानातील कुंदूझ प्रांतामध्ये अखुंड याने तालिबानचे नेतृत्व केले होते.

अमेरिकेच्या मानव विरहित विमानांनी काल केलेल्या हल्ल्यात अखुंड ठार झाला असल्याच्या वृत्ताला तालिबानच्या प्रवक्‍त्याने दुजोरा दिला आहे. अखुंड हा ठार झाल्याचे वृत्त या पूर्वीही अनेकदा आले होते. मात्र, खुद्द तालिबानकडूनच अखुंड हा ठार झाल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकी विमानांनी काल केलेल्या हल्ल्यात तालिबानचे अनेक दहशतवादी ठार झाले. त्यात अखुंडचा समावेश होता, असे सांगण्यात आले. अमेरिकी लष्कराच्या प्रवक्‍त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 2015मध्ये अखुंडच्या नेतृत्वाखाली तालिबानने कुंदूझ शहराच्या काही भागावर ताबा मिळविला होता.

ग्लोबल

डोकलामबाबतही पूर्वीची भूमिका कायम बीजिंग: लडाखमध्ये पेगॉंग सरोवराच्या काठावरून "पीपल्स लिबरेशन आर्मी'ने भारतीय हद्दीमध्ये...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

बीजिंग - लडाखमध्ये पेगॉंग सरोवराच्या काठावरून "पीपल्स लिबरेशन आर्मी'ने भारतीय...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव प्रकरणासाठी पाकिस्तानचे माजी ऍटर्नी जनरल यांची तर्दथ न्यायाधीश (ऍड-हॉक जज) नियुक्ती होण्याची शक्‍यता...

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017