सौदी अरेबियात नृत्य करणाऱ्या 14 वर्षीय मुलास अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

ट्विटरवर या मुलाच्या कृतीवरुन दोन गट पडले होते. काही जणांनी त्याच्या या कृतीचे स्वागत करत तो एक "नायक' असल्याचे म्हटले होते; तर काही जणांनी त्याचे हे कृत्य "अनैतिक' असल्याचे मत व्यक्त केले होते

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय गाण्यावर नृत्य करणाऱ्या 14 वर्षीय किशोरास "सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन' केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या मुलाच्या राष्ट्रीयत्वाची माहिती अद्यापी उघड करण्यात आलेली नाही. या मुलावर खटला चालविण्यात येणार अथवा नाही, यासंदर्भातही अद्याप कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. या मुलाचा जेद्दाहमधील एका वर्दळीच्या रस्त्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला होता. किंबहुना ट्विटरवर या मुलाच्या कृतीवरुन दोन गट पडले होते. काही जणांनी त्याच्या या कृतीचे स्वागत करत तो एक "नायक' असल्याचे म्हटले होते; तर काही जणांनी त्याचे हे कृत्य "अनैतिक' असल्याचे मत व्यक्त केले होते.

Web Title: Teenager arrested for dancing on Saudi street