कंदहार विमान अपहरणातील दहशतवाद्याचा पाकिस्तानात खात्मा

1999 मध्ये एअर इंडियाच्या IC-814 विमानाच्या अपहरणात त्याचा सहभाग होता.
Air India
Air India Sakal

कराची : कंदहार विमान अपहरणात सहभागी असलेल्या जहूर मिस्त्री (Zahoor Mistry) ऊर्फ जाहिद अखुंद या दहशतवाद्याची पाकिस्तानातील (Pakistan) कराचीमध्ये (Karachi) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. झहूर नाव बदलून कराचीमध्ये व्यापारी म्हणून राहत होता. 1999 मध्ये एअर इंडियाच्या IC-814 विमानाच्या अपहरणात त्याचा सहभाग होता. 1 मार्च रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्याची हत्या करण्यात आली. याबाबत इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केले आहे. (Terrorist Who Hijacked Air India Flight In 1999 Killed In Pakistan)

इंडिया टूडेने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, जहूर हा कराचीमध्ये व्यापारी असल्याचे भासवून लपून बसला होता. दरम्यान, जहूर याची हत्या करणारे हल्लेखोर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यांनी मास्क घातलेले असल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. हत्येपूर्वी दोन्ही दुचाकीस्वारांनी परिसरात रेकी करून हा हल्ला केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या (Air India) विमानाच्या अपहरणाचा कट जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, अल उमर मुजाहिद्दीनचा म्होरक्या, मुश्ताक अहमद जरगर आणि ब्रिटिश वंशाचा अल-कायदाचा नेता अहमद उमर सईद शेख यांची भारतीय तुरुंगातून सुटका करण्यासाठी रचण्यात आला होता. यामध्ये अपहरणकर्त्यांनी IC-814 विमानातील 176 प्रवाशांना सात दिवस ओलीस ठेवले होते.

24 डिसेंबर 1999 रोजी भारतीय विमानाचे अपहरण

इंडियन एअरलाइन्सचे विमान IC-814 नेपाळची राजधानी काठमांडू येथून 24 डिसेंबर 1999 रोजी अपहरणकर्त्यांनी ताब्यात घेतले होते. हे विमान काठमांडूहून दिल्लीला जाणार होते, मात्र अपहरणकर्त्यांनी ते अफगाणिस्तानातील कंदहार येथे नेले. त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. कंदाहारमध्ये विमान उतरण्यापूर्वी अमृतसर, लाहोर आणि दुबईलाही नेण्यात आले होते. (Kandahar Air India Flight Hijacked)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com