मुलीची हत्या फेसबुकवरून केली 'लाईव्ह'

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

बॅंकॉक (थायलंड)- एका पित्याने आपल्या अकरा वर्षाच्या मुलीची हत्या फेसबुकवरून लाईव्ह केली. मुलीच्या हत्येनंतर त्यानेही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वुत्तीसान वाँगतलेय याने मुलीच्या हत्येचे दोन लाईव्ह व्हिडिओ फेसबुकव अपलोड केले. फेसबुकवर दोन तास तो व्हिडिओ दिसत होता. यानंतर तो काढून टाकण्यात आला. मुलीच्या हत्येनंतर त्यानेही आत्महत्या केली. त्याने त्याच्या आत्महत्येचा व्हिडिओ लाईव्ह केला नाही. परंतु, त्याचा मृतदेह मुलीच्या मृतदेहाशेजारीच आढळून आला.

वुत्तीसान याची पत्नी त्याच्यापासून वेगळी रहात होती. यामधून आलेल्या नैराष्यामधूनच त्याने मुलीचा खून करून आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे, असेही पोलिसांनी सांगितले.