...तर आम्ही काश्‍मीरमध्ये सैन्य घुसवू: नवी चिनी धमकी

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

पाकिस्तानी सरकारने विनंती केल्यास भारत-पाकिस्तानचा वाद असलेल्या काश्‍मीरमध्ये; अगदी भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या काश्‍मिरी भूमीमध्येही तिसऱ्या देशाचे सैन्य घुसू शकते

नवी दिल्ली - "सिक्कीम सेक्‍टरमध्ये चिनी सैन्याकडून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे बांधकाम भूतानच्या वतीने रोखण्याचा भारतीय लष्कराचा न्याय काश्‍मीरलादेखील लागू केला जाऊ शकतो,' असा इशारा चीनमधील एका "थिंक टॅंक'च्या माध्यामामधून देण्यात आला आहे.

"चायना वेस्ट नॉर्मल युनिव्हर्सिटी' येथील "सेंटर फॉर इंडियन स्टडीज'चे संचालक लॉंग शिंगचुन यांनी "ग्लोबल टाईम्स' या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीच्या वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या लेखामध्ये हा इशारा देण्यात आला आहे. "काश्‍मीरमध्येही पाकिस्तानच्या विनंतीवरुन तिसऱ्या देशाचे सैन्य घुसू शकते,' असे शिंगचुन यांनी या लेखामध्ये म्हटले आहे.

"भूतानच्या भूमीचे संरक्षण करण्याची विनंती भारताला करण्यात आली असली; तरी या संरक्षणाची मर्यादा केवळ "मान्यता' असलेल्या भूमीपर्यंत असावयास हवी; "मतभेद' असलेल्या भूमीशी याचा संबंध नाही. नाहीतर या न्यायाने पाकिस्तानी सरकारने विनंती केल्यास भारत-पाकिस्तानचा वाद असलेल्या काश्‍मीरमध्ये; अगदी भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या काश्‍मिरी भूमीमध्येही तिसऱ्या देशाचे सैन्य घुसू शकते,'' असे शिंगचुन यांनी म्हटले आहे.

भूतान-भारत-चीन अशा ट्रायजंक्‍शनजवळ असलेल्या दोकलाम भागामध्ये भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर, ग्लोबल टाईम्सच्या माध्यमामधून भारताला चीनकडून नवनवीन इशारेवजा धमक्‍या देण्यात येत आहेत. ट्रायजंक्‍शनचा हा भाग भारताच्या "चिकन नेक' वा "सिलिगुडी कॉरिडॉर'पासून अत्यंत जवळ आहे. यामुळे या प्रदेशास व्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
सरताज अझीझ यांनी माझ्या पत्राची दखलही घेतली नाही: स्वराज
पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व मुलाची हत्या​
तांत्रिक कारणामुळे 'एनएसई'वरील व्यवहार बंद
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

ग्लोबल

नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या...

11.27 AM

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक...

10.33 AM

न्यूयॉर्क : किम जोंग उन यांनी आपली चिथावणीखोर कृत्ये सुरूच ठेवली, तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्‌ध्वस्त केले जाईल, असा गंभीर...

10.03 AM