सात खलाशांचे मृतदेह सापडले

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

टोकिओ: अमेरिकी नौदलाच्या "यूएसएस फित्झजेराल्ड' या युद्धनौकेला जपानच्या किनाऱ्याजवळ झालेल्या अपघातानंतर बेपत्ता झालेल्या सात खलाशांचे मृतदेह सापडले आहेत. युद्धनौकेतील झोपण्यासाठीच्या लहान खोल्यांमध्ये अपघात झाल्यानंतर पाणी शिरल्यामुळे नौदलाच्या सात खलाशांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेकडून देण्यात आली.

मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकेच्या नौदलाच्या सात कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्यात आली आहे. अमेरिकी नौदलाच्या जपानमधील योकोसुका येथील तळावर अपघातग्रस्त युद्धनौका आणण्यात आल्यानंतर या युद्धनौकेतील राहण्याच्या खोल्यांमध्ये बेपत्ता सात खलाशांचे मृतदेह आढळले. अपघात झाला त्या वेळी अनेक खलाशी झोपेत होते. त्यामुळे खोल्यांमध्ये झोपलेल्या सात खलाशांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. फिलिपिन्सच्या एका मालवाहू जहाजाची आणि अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकेची शनिवारी धडक झाली होती. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स