'विशिष्ट' नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा झाला अवघड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

या नव्या नियमावलीनुसार, या विशिष्ट अर्जदारांना गेल्या पाच वर्षांत वापरलेले दूरध्वनी क्रमांक, ई मेल, सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स यांची माहिती अमेरिकन सरकारला द्यावी लागणार आहे. या नागरिकांचे सोशल मिडीया पासवर्डस वा इतर अन्य स्वरुपाची गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जाणार नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून ध्वनित करण्यात आले आहे.

वॉशिंग्टन : दहशतवादाचा प्रभाव असलेल्या भागांमधील नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा हवा असल्यास त्यांना सोशल मिडीयावरील त्यांचे अस्तित्व, ई मेल अॅड्रेस व दूरध्वनी क्रमांक, अशी सर्व माहिती तपासणीसाठी द्यावी लागणार आहे.

सरकारला या प्रस्तावित निर्णयासंदर्भात जनमत जाणून घ्यावयाची इच्छा आहे. मात्र या योजनेची येत्या 18 मेपासून सहा महिन्यांच्या 'तात्पुरत्या काळा'साठी अंमलबजावणी केली जावी, यासाठीही ट्रम्प प्रशासन प्रयत्नशील आहे. 

दहशतवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागामधून प्रवास केलेल्या नागरिकांसाठी कडक तपासणीचे हे नियम लागू केले जाणार आहेत. अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या एकूण नागरिकांमध्ये अशा विशिष्ट नागरिकांचे प्रमाण 0.5% (सुमारे 65 हजार) इतके असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

या नव्या नियमावलीनुसार, या विशिष्ट अर्जदारांना गेल्या पाच वर्षांत वापरलेले दूरध्वनी क्रमांक, ई मेल, सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स यांची माहिती अमेरिकन सरकारला द्यावी लागणार आहे. या नागरिकांचे सोशल मिडीया पासवर्डस वा इतर अन्य स्वरुपाची गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जाणार नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून ध्वनित करण्यात आले आहे.

गेल्या वर्षापासून अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांकडून वापरण्यात येणाऱ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सची माहिती मिळविण्यास येथील प्रशासनाने सुरुवात केली आहे. याआधी, व्हिसा अर्ज करणाऱ्यांना ही माहिती देणे बंधनकारक नव्हते. या माहितीचा 
अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांची काटेकोर तपासणी करण्यासंदर्भातील धोरण ट्रम्प प्रशासनाकडून राबविले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाकडून हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे.