ट्रम्प आणि रोम्नी यांच्यात चर्चा 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन- निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची "कजाग, भ्रष्टाचारी' अशी संभावना करणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते मीट रोम्नी यांनी आज ट्रम्प यांची भेट घेऊन जागतिक राजकारणावर चर्चा केली.

नव्या प्रशासनात गृहमंत्री म्हणून रोम्नी यांच्या नावाची चर्चा असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट झाली. रोम्नी हे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत होते. रोम्नी यांच्यातील क्षमतेकडे पाहून ट्रम्प हे त्यांना महत्त्व देत असल्याचे आणि नव्या प्रशासनात घेण्यास उत्सुक असल्याचे समजते. 

दरम्यान, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ या डोनाल्ड ट्रम्प यांना लवकरच ब्रिटन दौऱ्यासाठी निमंत्रण देतील, असे लंडनमधील माध्यमांनी सांगितले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पुढील वर्षी जून अथवा जुलैमध्ये ही भेट होण्याची शक्‍यता आहे. ट्रम्प यांनीही ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना अमेरिका दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. ब्रिटन युरोपीय महासंघाच्या बाहेर पडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मे यांच्यासाठीही अमेरिकेशी संबंध दृढ करणे महत्वाचे आहे. 

ग्लोबल

वॉशिंग्टन: भारताकडून धोका निर्माण होत असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक दहशतवादाला खतपाणी घातले जात असून, ते तात्काळ...

07.27 AM

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून,...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017