ट्रम्प करणार पाकला सर्व मदत?

पीटीआय
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पाकिस्तान सरकारचा दावा

इस्लामाबाद : पाकिस्तानला भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही प्रकारची भूमिका बजावण्यास तयार असल्याचे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सांगितल्याचा दावा येथील पंतप्रधान कार्यालयाने केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल (ता. 30) रात्री ट्रम्प यांना दूरध्वनी करत विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली. या वेळी ट्रम्प यांनी ही मदत देऊ केल्याचे पाकिस्तान सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

"पाकिस्तानच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी तुम्हाला हवी ती भूमिका पार पाडण्यास मला आवडेल. हा माझा सन्मान असून, मी व्यक्तिश: हे करेन. मी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीही तुम्ही मला कधीही फोन करू शकता,' असे ट्रम्प यांनी शरीफ यांना सांगितल्याचे निवेदनात म्हटले आहे. शरीफ यांच्याबद्दल आपले मत चांगले असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

"पाकिस्तान हा फार सुंदर देश असून, पाकिस्तानी नागरिक अत्यंत बुद्धिमान असतात,' असेही ट्रम्प यांनी म्हटल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे. शरीफ यांनीही ट्रम्प यांना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ग्लोबल

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

09.03 PM

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017