ट्विटरच्या चीनमधील प्रमुख केथी चेन यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

शांघाय- सोशल नेटवर्किंगमध्ये जगातील आघाडीच्या संकेतस्थळांपैकी एक असलेल्या ट्विटरच्या चीनमधील प्रमुख केथी चेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

केथी चेन यांनी एका ट्विटमधूनच आपण ट्विटर सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्याकडे आठ महिन्यांपूर्वीच ट्विटरच्या चीनमधील व्यवसायाची सूत्रे सोपविण्यात आली होती. चीनमध्ये 2009 पासून ट्विटर 'ब्लॉक' करण्यात आलेले आहे, मात्र व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क्सवरून (VPN) येथे ट्विटर वापरले जाते. 

चीनमध्ये देशांतर्गत सोशल मीडियाला जास्त वाव देण्यात आला असून, त्यामध्ये 'सिना वेईबो' हे मायक्रोब्लॉगिंगचे संकेतस्थळ आणि 'वीचॅट' हे मेसेजिंग अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरम्यान, चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनुआ यांसारख्या चीनी संस्थाही लोकांपर्यंत पोचण्यासाठी ट्विटरचा वापर करतात.
 
ग्लोबल

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

03.45 PM

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017