मोदीजी, कुलभूषण जाधव यांना वाचवा..!

टीम ई सकाळ
सोमवार, 10 एप्रिल 2017

हेरगिरीच्या आरोपावरून अटक केलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली. याविरोधात ट्‌विटर युझर्सने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला; तसेच कुलभूषण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार लक्षणीय प्रयत्न करत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे दोघेही या प्रकरणी काय भूमिका घेतात आणि कुलभूषण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करतील का, असा प्रश्‍न बहुसंख्य ट्विटर युझर्सला पडलेला आहे.