बॉंब करण्याच्या साहित्यासह दोघांना पॅरिसमध्ये अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ते हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, या 23 आणि 29 वर्षीय दोघा संशयितांची नावे सांगण्यास सूत्रांनी नकार दिला

पॅरिस - बंदुका आणि बॉंब तयार करण्याचे साहित्य बाळगणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक करून त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ते हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, या 23 आणि 29 वर्षीय दोघा संशयितांची नावे सांगण्यास सूत्रांनी नकार दिला. त्यांच्याकडील साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गृहमंत्री मॅथियास फेक्‍ल म्हणाले, ""अध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या रविवारी मतदान होत असून, पुढील काही दिवस फ्रान्समध्ये निवडणुकीची धावपळ असेल. मागील आठवड्यात दोघा संशयितांची छायाचित्रे सुरक्षा यंत्रणेकडे देण्यात आली होती. सुरक्षिततेच्या कारणासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे.'' कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे उमेदवार फ्रान्कॉइस फिलॉन यांनी काहीतरी भयानक घडणार असल्याचा इशारा शुक्रवारी दिला होता, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स