Ukraine Russia War : 'गंगा' अंतर्गत 24 तासात 4 हजार भारतीय मायदेशी

Ukraine Russia War : 'गंगा' अंतर्गत 24 तासात 4 हजार भारतीय मायदेशी
Summary

युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाचं रुपांतर शेवटी युद्धात झालं. गुरुवारपासून युद्धाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी युक्रेनमधून अत्यंत विदारक दृश्य समोर आली. अनेक शहरांवर बॉम्बहल्ले करण्यात आले. यामध्ये पहिल्याच दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला.

रशियन सैनिक युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रं आणि बॉम्बस्फोट करत आहेत. राजधानी किव्हमध्ये रशियन सैन्याची कारवाई सतत सुरूच आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडमध्ये पोहोचल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे.

  • ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत 48 विमानं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन मायदेशी दाखल झाली. त्यापैकी 18 विमानं गेल्या 24 तासात उतरली आहेत. या 18 विमानांमधू सुमारे 4000 भारतीय परतले आहेत : भारत सरकार

  • रशियासोबतच्या चर्चेसाठीचं स्थान म्हणून युक्रेनने बेलारूसला नाकारलं आहे.

  • युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय की त्यांचा देश रशियाशी शांतता चर्चेसाठी तयार आहे मात्र, बेलारूसमध्ये चर्चा नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

  • युक्रेनमधून भारतीयांची पहिली तुकडी सुसेवाची सीमा ओलांडून रोमानियाला पोहोचली आहे. सुसेवा येथील टीम आता भारतीयांच्या पुढील प्रवासासाठी बुखारेस्टला जाण्याची सोय करेल: MEA प्रवक्ते अरिंदम बागची

  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनियन लष्कराला म्हटलंय की, 'सत्ता तुमच्या हातात घ्या'..

  • केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन 26 फेब्रुवारी रोजी विशेष विमानाने युक्रेनहून दिल्लीत येणाऱ्या भारतीय नागरिकांचे स्वागत करणार आहेत.

  • भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलंय की त्यांना युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा कॉल आला. त्यांनी सद्य परिस्थितीबाबत मला माहिती दिली. मुत्सद्देगिरी आणि संवाद यातून बाहेर पडण्याच्या मार्गाचे भारत समर्थन करतो, असं मी त्यांना सांगितलं. विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांच्या दुर्दशेवर देखील चर्चा केली. ते सुरक्षितरित्या कसे परततील याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत.

  • युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय की, रशियासोबतच्या या संघर्षात आतापर्यंत 1,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत.

  • भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चेरनिव्त्सी येथून युक्रेन-रोमानिया सीमेवर रवाना झाली आहे. MEA कॅम्प ऑफिस आता पश्चिम युक्रेनमधील ल्विव्ह आणि चेरनिव्हत्सी शहरांमध्ये देखील कार्यरत आहेत. या कॅम्प ऑफिसमध्ये अतिरिक्त रशियन भाषिक अधिकारी पाठवले जात आहेत.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बातचित केली आहे. युक्रेनशी 'वाटाघाटी' करण्याचे आवाहन त्यांनी केलंय.

  • युक्रेनच्या सैन्याने लढाई थांबवली की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी सांगितलंय - रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार

  • युक्रेनमधील भारतीय दूतावास युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांना/विद्यार्थ्यांसाठी आणखी एक ऍडव्हायजरी जारी केली आहे. भारत सरकार रोमानिया आणि हंगेरी मार्गे भारतीयांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.

  • वाढलेल्या विमान भाड्याच्या तक्रारी लक्षात घेता आता युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी भारत सरकार काही विमानांची व्यवस्था करणार आहे. या विमान प्रवासाचा खर्च सरकार उचलणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

रशियानं युकेला विमानतळ आणि एअर स्पेस वापरण्यास घातली बंदी

रशियाने ब्रिटिश विमान कंपन्यांना त्यांच्या विमानतळांवर उतरण्यास तसेच रशियाचे हवाई क्षेत्रातून जाण्यास बंदी घातली आहे, असे रशियाच्या राज्य नागरी विमान वाहतूक नियामकाने सांगितले.

रशियान फौजा उत्तर कीव्हमध्ये धडकल्या आहेत. याठिकाणी रशियन सैनिकांनी जोरदार गोळीबार केला. रशियन समर्थक सैन्याने केलेल्या गोळीबारानंतर पूर्व युक्रेनमधील स्टारोबिल्स्कमध्ये विध्वंस झाला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना हंगरी आणि रोमानिया मार्गे बाहेर काढणार

युक्रेनमध्ये २० हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना हंगरी आणि रोमानिया मार्गे युक्रेनमधून बाहेर काढून भारतात आणलं जाणार आहे.

युक्रेनच्या सैनिकांचे गणवेश घालून रशियाच्या सैनिकांनी युक्रेन सैनिकांची वाहने जप्त केली. याच वाहनांनी रशियाचे सैनिक कीव्हकडे रवाना होत आहेत, अशी माहिती युक्रेनच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं बीएनओ न्यूजनं दिलीय.

भारताकडून औषधांसह राजकीय मदत मिळावी - युक्रेन खासदार

युक्रेनच्या खासदाराने भारताकडून औषधांसह राजकीय मदत मागितली आहे. युक्रेनला केवळ शस्त्रांची गरज नाहीतर त्या मानसिक पाठिंब्याची गरज आहे. रशिया आमच्यासारख्या शांततापूर्वी देशातील लोकांना मारत आहे. सर्व भारतीय राजकारण्यांनी एका सार्वभौम देशाच्या मानवी हक्कांचे रक्षण करावे, असं युक्रेनच्या खासदार सोफिया फेडयना म्हणाल्या. त्या इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

युक्रेनची रशियासह बेलारुसच्या चलनावर बंदी -

युक्रेनच्या मध्यवर्ती बँकेने रशिया आणि बेलारूसमधील संस्थांना तसेच दोन्ही राष्ट्रांच्या चलनांचा समावेश असलेल्या ऑपरेशन्सवर बंदी घातली आहे,

नागरिकांवर बॉम्बहल्ला -

युक्रेनमध्ये नागरिकांवर देखील हल्ले करण्यात येत आहे. एक व्यक्ती सायकलने जात असताना अचानक त्याच्यावर बॉम्बहल्ला झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजधानी कीव्ह शहरावर हवाई हल्ल्याचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

युक्रेनच्या सैन्याने शुक्रवारी पहाटे कीववर घोंगावत असलेले रशियाचे एक विमान पाडले. पण, हे विमान रहिवासी इमारतीवर कोसळले. त्यामुळे इमारतीला आग लागली, असं वृत रायटर्सने दिले आहे.

रशियाविरोधात सायबर हल्ला? -

निनावी हॅकर्सने रशियाविरुद्ध सायबर युद्धाची घोषणा केली आहे. निनावी हॅकर्सने म्हटले की, आम्ही रशियाविरोधात सायबर युद्धाची घोषणा केली आहे. तसेच काही तासांपासून रशिया टुडे ही वेबसाईट हॅक झाली आहे. त्याची जबाबदारी देखील या गटानं स्वीकारली आहे.

१३ सैनिक ठार -

युक्रेनियन बेटावरील 13 सैनिकांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्यानं रशियन युद्धनौकेने १३ सैनिकांना ठार केले.

युक्रेनच्या राजधानीमध्येही स्फोट -

रशियानं निवासी इमरातींवर देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये देखील रशियानं बॉम्ब हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी पहाटे कीव्हमध्ये दोन मोठ्या स्फोठ झाल्याचं सीएनएन म्हटलं आहे, तर तिसरा मोठा स्फोट राजधानीपासून काही अंतरावर झाला आहे.

अणुभट्टीवर रशियाचा ताबा -

रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. या प्लांटमधील कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवण्यात आले होते. 1986 मध्ये घडलेल्या आपत्तीनंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं. आता ही अणुभट्टीवर रशियाच्या ताब्यात असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

रशिया युक्रेनमध्ये सरकार स्थापन करणार? -

कीवसह इतर प्रमुख शहरे ताब्यात घेऊन सरकार स्थापन करण्याचा रशियाचा हेतू असू शकतो, असं अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले.

अनेकजण जखमी -

युद्धाच्या पहिल्या दिवशी तब्बल युक्रेनमध्ये १३७ जणांचा मृत्यू झाला. रशियाच्या हल्ल्यात 10 लष्करी अधिकाऱ्यांसह आतापर्यंत 316 लोक जखमी झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हवाल्याने एएफपीने हे वृत्त दिलं आहे.

युद्धाविरोधात निदर्शने करणाऱ्यांविरोधात कारवाई -

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी सैन्य पाठवल्यानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी युद्धाविरोधात निदर्शने केली. त्यानंतर रशियन पोलिसांनी १७०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे, असं वृत्त एफपीने दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com