युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींना फोन, म्हणाले...

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज तिसरा दिवस आहे.
Ukrainian President Volodymyr Zelensky
Ukrainian President Volodymyr Zelensky Sakal

Ukrain-Russia War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज तिसरा दिवस असून, रशियन सैन्या युक्रेनची राजधानी किवपासून अवघ्या काही अंतरावर दाखल झाली आहे. दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra MOdi) यांच्याशी फोनवरू संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये पाठिंबा देण्याची विनंती मोदींना केली आहे. (Ukrainian President Volodymyr Zelensky Call PM Narendra Modi)

दरम्यान, यावेळी युक्रेनच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीबद्दल तपशीलवार माहिती दिली. युक्रेनमध्ये संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. हिंसाचार तात्काळ थांबवावा आणि संवादाकडे परत यावे असे म्हणत शांततेसाठी योगदान देण्याची भारताची तयारी असल्याचे मोदी यांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांना सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांच्या सुरक्षा आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. तसेच युक्रेनच्या अधिकार्‍यांकडून भारतीय नागरिकांना त्वरीत आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्याची मागणी केली आहे. 25 फेब्रुवारी रोजी UNSC मधील मतदानात भारताच्या स्वतंत्र आणि संतुलित भूमिकेची रशियाच्या भारतातील दुतावासकडून प्रशंसा करण्यात आली आहे.

मायदेशी परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना राजदूतांचा भावूक संदेश

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांना घेऊन पहिल्या विमानाने रोमानियाहून काही वेळापूर्वी पहिले विमान काही वेळापूर्वी मुंबईला रवाना झाले आहे, अशी माहिती विदेश मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. हे विमान भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहे.

दरम्यान, विमानाने उड्डाण करण्यापूर्वी रोमानियातील भारतीय राजदूतांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये भारतीय राजदूत विमानातील विद्यार्थ्यांना भावनिक संदेश देताना दिसत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, रोमानियातील भारताचे राजदूत राहुल श्रीवास्तव विमानात भारतीय नागरिकांना विशेष संदेश देत आहेत.

"संपूर्ण भारत सरकार सर्वांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आणि जोपर्यंत आम्ही शेवटच्या व्यक्तीला बाहेर काढत नाही तोपर्यंत आमचे मिशन पूर्ण होणार नाही." त्यांनी विमानाच्या माइकवरून युक्रेनमधून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक भारतीयाने हा दिवस त्यांच्या आयुष्यात लक्षात ठेवण्यास सांगितले आहे. जेव्हाही आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा हा दिवस लक्षात ठेवा असे ते म्हणाले.

Ukrainian President Volodymyr Zelensky
मराठी राजभाषा दिन : बोलीभाषेतील हरवलेल्या शब्दांची गोष्ट

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, भारतासह जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवण्याचा सल्ला दोन्ही देशांच्या नेत्यांना दिला आहे. युक्रेनमधील परिस्थिती चिघळल्यानंतर युक्रेनच्या भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा (Dr Igor Polikha) यांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्याचे आणि हे युद्ध थांबवण्यास सांगण्याचे कळकळीचं आवाहन केले होते. त्यानंतर आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून संयुक्त राष्ट्र संघात पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. भाजपच्या नेत्या हेमा मालिनी यांनी मोदींबद्दल मोठे विधान केले आहे. (World Leaders Wants Modi Come Ahead To Stop Russia Ukraine War)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com