एक चतुर्थांश लंकेसमोर अन्नटंचाईचे संकट!

संयुक्त राष्ट्रांचा दावा; खते उपलब्ध नसल्याचा परिणाम
United Nations claims Crisis of food scarcity in sri Lanka
United Nations claims Crisis of food scarcity in sri LankaEsakal

कोलंबो : श्रीलंकेतील जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून एकून लोकसंख्येपैकी २२ ते २५ टक्के, म्हणजे ४९ लाख लोकांसमोर अन्नटंचाईचे संकट उभे आहे, असा दावा संयुक्त राष्ट्रांच्या निवासी समन्वयक हॅना हॅम्डी यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘‘श्रीलंकेत रासायनिक खतांवर अचानक आणि पूर्णपणे निर्बंध लागू केल्याने पीक उत्पादन कमी झाले आहे. तसेच, अद्यापही या खतांची उपलब्धता अत्यल्प आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. ’’

मे महिन्यात अन्नधान्याच्या महागाईत ५७.४ टक्के वाढ झाली होती. याशिवाय, स्वयंपाकाचा गॅस, आणि अनेक अन्न घटकांची कमतरताही देशात जाणवत आहे. विस्कळीत वाहूतक, उद्योग बंद पडणे, वीजेचा तुटवडा या समस्या नित्याच्या झाल्या आहेत. अन्न टंचाईचा सामना करण्यासाठी अनेक नागरिकांनी एक वेळचे जेवण सोडले आहे. अनेकांनी जेवणाचे प्रमाण कमी केले आहे.

‘आयएमएफ’ करणार पाहणी

श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी लवकरच पथक पाठविणार असल्याचे या संस्थेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. श्रीलंकेला कोणत्या मार्गाने आर्थिक मदत करायची, कर्जफेड करण्यासाठीचे आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठीचे उपाय याबाबत चर्चा केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com