'यूएन'मधील अमेरिकेच्या राजदूतपदी निक्की हेली?

पीटीआय
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हेली यांची संयुक्त राष्ट्रातील (यूएन) अमेरिकेच्या राजदूतपदी निवड केली असून, ट्रम्प यांनी देऊ केलेले हे पद स्वीकारण्यास हेली यांनीही होकार दिल्याचे समजते. भारतीय-अमेरिकी वंशाच्या हेली यांनी गुरुवारी ट्रम्प यांची न्यूयॉर्क येथील ट्रम्प टॉवरमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त अमेरिकेतील वृत्तपत्राने दिले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज करण्यात आली.

भारतीय निर्वासिताची कन्या असलेल्या 44 वर्षीय हेली या रिपब्लिकन पक्षातील उभरते नेतृत्व असून, त्यांना परराष्ट्र धोरणाचा फारसा अनुभव नाही. त्यांनी सरकारमध्ये व्यापार आणि कामगार आदी विषयांवर काम केले आहे. त्या दक्षिण कॅरोलिनाच्या पहिल्या महिला आणि अल्पसंख्याक गव्हर्नर आहेत.
ट्रम्प यांनी केलेली ही पहिलीच नियुक्ती असून, त्याद्वारे ट्रम्प यांचा आपण निर्वासित आणि महिलांना प्राधान्य देणार असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे, असे मानले जाते.

Web Title: US Ambassador nikki haley in un