हिलरी क्लिंटन पुस्तकातून उलगडणार अमेरिकन निवडणुकीतील रहस्ये

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लढण्याचा अनुभव कसा होता, हिलरींकडून काय चुका झाल्या, या धक्कादायक पराभवाला त्या कशा सामोऱ्या गेल्या. त्यातून सावरत पुन्हा पुढे चालण्यासाठी त्यांना कुठून सामर्थ्य मिळाले याबद्दलचे वर्णन पुस्तकात आहे, असे त्यांनी सांगितले.

न्यूयॉर्क : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं की ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर विजय मिळवला?... याबद्दल संपूर्ण जगाला उत्सुकता आहे. या पराभवाची कारणे स्वतः हिलरी क्लिंटन आपल्या 'व्हॉट हॅप्पनड्' या पुस्तकातून उलगडणार आहेत. 

अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होत्या. रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी यांचे आव्हान मोडीत काढत अध्यक्षपद मिळवले. प्रचारादरम्यान झालेल्या चर्चांवरून हिलरी या अध्यक्षपदाच्या दावेदार मानल्या जात होत्या. तरीही ट्रम्प यांनी नेमका कसा विजय मिळवला याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. सायमन अँड शुस्टर यांच्या वतीने 'व्हॉट हॅप्पनड्' हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. 

"धावपळ कमी होऊन सध्या थोडासा निवांतपणा मिळाल्याने हिलरी आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या महिला उमेदवार म्हणून त्यांचे वैयक्तिक अनुभव मांडणार आहेत. या निवडणुकीत आक्रमकता, लिंगभेद, एकमेकांवरील अनपेक्षित आरोप-प्रत्यारोप, कल्पनेपेक्षा नाट्यमय राजकीय वळणं, रशियन हस्तक्षेप आणि सर्व नियम मोडणारा विरोधक होता," असे प्रकाशकांनी म्हटले आहे. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री