व्हिडिओ गेम्समुळे मुलांमध्ये वाढते मधुमेहाचे प्रमाण

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

'कोलंबीया एशिया हॉस्पिटल'ने केलेल्या एका सर्वेक्षणात मुलांमध्ये व्हिडिओ गेम्सच्या कल्चरमुळे टाईप-2 मधुमेहाचेही प्रमाण वाढत असल्याचे म्हटले आहे. आणि याचा परिणाम मुलांच्या एकंदर वाढीवर होत आहे. 

कोलंबिया - एका जागतिक सर्वेक्षणानुसार सध्या पाच वर्षाखालील मुले साधारणत: दिवसातले किमान पाच ते सात तास कोणत्यातरी डिजीटल स्क्रीन समोर घालवत असल्याचे लक्षात आले आहे. त्यात व्हिडिओ गेम्स तर मुलांचे सर्वात आवडीचे. 'कोलंबीया एशिया हॉस्पिटल'ने केलेल्या एका सर्वेक्षणात मुलांमध्ये व्हिडिओ गेम्सच्या कल्चरमुळे टाईप-2 मधुमेहाचेही प्रमाण वाढत असल्याचे म्हटले आहे. आणि याचा परिणाम मुलांच्या एकंदर वाढीवर होत आहे. 

'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेश'ने देखील या काही वर्षात टाईप-2 मधुमेहाचे प्रमाण मुलांमध्ये वाढत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आऴशीपणा, लठ्ठपणा या समस्या देखील मुलांमध्ये वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या मानसिक ओरोग्यावर देखील परिणाम होताना दिसत आहे.  

या समस्यांना तोंड देण्यासाठी मुलांना व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्याच्यात मैदानी खेळाबाबत रुची निर्माण होण्याची पालकांनी दक्षता घ्यायला हवी, तसेच मुलांच्या खाण्याच्या सवयींकडे देखील लक्ष देण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.