विजय मल्ल्यांची 'चोर, चोर' म्हणत उडविली हुर्यो

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी मल्ल्या पोहचला होता. पण, मैदानाच्या गेटवरच भारतीय प्रेक्षकांकडून त्याची हुर्यो उडविण्यात आली.

लंडन - बँकांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांची भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान भारतीय प्रेक्षकांकडून 'चोर, चोर' असे म्हणत हुर्यो उडविण्यात आली.

इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी मल्ल्या पोहचला होता. पण, मैदानाच्या गेटवरच भारतीय प्रेक्षकांकडून त्याची हुर्यो उडविण्यात आली. मल्ल्याला चोर आला. चोर, चोर असे म्हणत घोषणा देण्यात आल्या. मल्ल्या मात्र शांतपणे या गर्दीतून पुढे जात स्टेडियममध्ये पोहचला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

मल्ल्या भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी यापूर्वीही मैदानात गेला होता. तेव्हा त्याचा सुनील गावसकर यांच्याबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. भारतीय संघाच्या कार्यक्रमांना बिनदिक्कत हजेरी लावणारा मल्ल्या लंडनमध्ये राहत आहे. मल्ल्याने भारतीय बँकांचे सुमारे 9 हजार कोटींचे कर्ज बुडविले आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
बीड: बिंदुसरेवरील पर्यायी रस्ताही गेला वाहून
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता
#स्पर्धापरीक्षा - 'उडान योजना'​
पुण्यातील ‘ग्रॅंड’ गणेशोत्सव पर्यटनाचा ‘ब्रॅंड’ व्हावा!​
‘राहुल चमू’समोर मोठे आव्हान​
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी​