संकटाचा सामना करण्यास समर्थ : डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

वॉशिंग्टन: उत्तर कोरियाला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेकडे सक्षम, चांगले आणि जबरदस्त पर्याय असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

उत्तर कोरियाने जपानवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्याच्या एक दिवसानंतर ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या कुरापतीला तोंड देण्यासाठी प्रभावी उपाय असल्याचे नमूद केले. अमेरिका हवाई दलाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त हवाई दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन करताना ट्रम्प बोलत होते. कोणत्याही संकटाचा आणि धोक्‍याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेकडे प्रभावी उपाय असल्याचे ट्रम्प म्हणाले.