इफ्तार पार्टीची परंपरा ट्रम्प यांनी मोडली

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

वॉशिंग्टन: रमजानमध्ये व्हाइट हाउसमध्ये इफ्तार पार्टी देण्याची परंपरा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षी मोडली. व्हाइट हाउसमध्ये इफ्तार पार्टी न होण्याची गेल्या सुमारे 21 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.

तत्कालीन अध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी 1805 मध्ये व्हाइट हाउसमध्ये पहिल्यांदा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते; मात्र त्यानंतर दरवर्षी अशा प्रकारची पार्टी रमजानच्या महिन्यात नियमितपणे सुरू झाली नव्हती. बिल क्‍लिंटन यांच्या कार्यकाळात 1996पासून दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन व्हाइट हाउसमध्ये होऊ लागले.

या वर्षी व्हाइट हाउसने ईदनिमित्त एक निवेदन जाहीर केले. त्यात म्हटले आहे, "जगातील अन्य मुस्लिमांप्रमाणे अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिमांनीही रमजानचा महिना आपल्या धर्माच्या शिकवणीनुसार आणि दानधर्म करत पाळला. दया, सहानुभूती आणि चांगल्या वागणुकीचे महत्त्व यंदा ईदनिमित्त पुन्हा एकदा आम्ही अधोरेखित करतो. अमेरिका या मूल्यांप्रती वचनबद्ध आहे.''