क्‍युबा करार ट्रम्प यांच्याकडून रद्द

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत झालेल्या क्‍युबा कराराला एकतर्फी असल्याचा दावा करत हा करार रद्द केला. मात्र तेथे दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी क्‍युबावर नव्याने प्रवास आणि व्यापारी निर्बंध घातले आहेत. ट्रम्प यांनी मियामी येथे म्हटले की, मागील सरकारने क्‍युबावर लावलेले प्रवास आणि व्यापारी निर्बंधात सवलत दिल्याने क्‍युबाच्या लोकांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही. ट्रम्प यांनी ओबामा यांच्या क्‍युबा कराराला एकतर्फी करार असल्याचे घोषित करत रद्द केला. व्हाईट हाउसच्या निवेदनात म्हटले की, अमेरिकेचे नागरिक आणि कंपन्या क्‍युबासमवेत व्यापार करू शकणार नाही. मात्र क्‍युबामधील अमेरिकेचे दूतावास बंद करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. ट्रम्प यांनी म्हटले की, क्‍युबात अमेरिकेचा दूतावास चालू राहील. उभय देशातील संबंध अधिक मजबूत आणि चांगले होतील, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.