मसूद अजहर हा "बॅड गाय'

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

अमेरिकेचे मत; जागतिक दहशतवादी घोषित करण्याची इच्छा

वॉशिंग्टन : पाकिस्तानस्थित जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर हा "बॅड गाय' (अतिशय वाईट व्यक्ती) असून, त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले पाहिजे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे.

अमेरिकेचे मत; जागतिक दहशतवादी घोषित करण्याची इच्छा

वॉशिंग्टन : पाकिस्तानस्थित जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर हा "बॅड गाय' (अतिशय वाईट व्यक्ती) असून, त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले पाहिजे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे.

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अजहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात झालेल्या प्रयत्नांमध्ये चीनने अडथळा आणल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने अजहरविषयी आपले मत व्यक्त केले. अजहर हा पाकिस्तानमध्ये राहात आहे. त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनचा पाठिंबा होता. या प्रस्तावावर गेल्या आठवड्यात चीनने चौथ्यांदा अडथळा आणला. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या अल कायदा प्रतिबंध समितीच्या सदस्यांचे यावर एकमत नसल्याचे कारण चीनने दिले आहे.

जैशे महंमद या अजहरने निर्माण केलेला दहशतवादी संघटनेचा आधीपासूनच संयुक्त राष्ट्रसंघाद्वारा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते हीदर नोर्ट यांनी पत्रकार परिषदेत चीनच्या निर्णयावर विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले, की मसूद ही अतिशय वाईट व्यक्ती आहे, असे आम्ही निश्‍चितच मानतो. त्याचा या यादीत समावेश केला जावा, असे आम्हाला वाटते.

नोर्ट म्हणाले, की मसूदचा बंदीच्या यादीत समावेश करण्यावर समितीवर चर्चा सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघांतर्गत ही यादी गोपनीय असल्यामुळे मी कोणतीही टिप्पणी करू शकत नाही. चीनच्या निर्णयाविषयी तुम्हाला चीनच्या सरकारलाच विचारावे लागेल.

Web Title: washington news masood azhar bad guy