हाफीज सईदच्या मुक्ततेवरून अमेरिका नाराज

हाफीज सईदच्या मुक्ततेवरून अमेरिका नाराज

वॉशिंग्टन : हाफीज सईद हा संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेने जाहीर केलेला दहशतवादी नेता आहे, असे स्पष्ट करत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आज त्याच्या मुक्ततेवरून नाराजी व्यक्त केली. जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या सईदला स्थानबद्धतेतून मुक्त करण्याचा आदेश पाकिस्तानमधील न्यायालयाने दिल्याच्या पार्श्‍ववभूमीवर अमेरिकेने भूमिका जाहीर केली आहे.

हाफीज सईदवर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे इनाम पूर्वीच जाहीर केले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासून त्याला पाकिस्तान सरकारने स्थानबद्धतेत ठेवले होते. त्याला मुक्त करण्याच्या पाकिस्तानमधील न्यायालयाच्या निर्णयावर ट्रम्प प्रशासनाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. "हाफीज सईदला अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी जाहीर केले आहे. त्याच्या संघटनेवरही अमेरिकेचे निर्बंध आहेत. सईद आणि त्याची संघटना ही अनेक निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे,' असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, सईदसारख्या दहशतवाद्याला मुक्त केल्याने पाकिस्तानला अमेरिकेने दिलेला महत्त्वाचा मित्र देश हा दर्जा काढून घ्यावा, अशी विनंती अमेरिकेतील तज्ज्ञांनी केली आहे.

हाफीजचा नवा व्हिडिओ
इस्लामाबाद : स्थानबद्धतेतून मुक्त झालेल्या हाफीज सईदने "काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी' काम करण्याची प्रतिज्ञा घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. "मी काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. काश्‍मीर मुक्त होण्यासाठी मी प्रार्थना करतो,' असे तो म्हणत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com