मिशेल ओबामांवर वांशिक टिपण्णी करणारे 'घरी'

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

क्ले (वेस्ट व्हर्जिनिया)- अमेरिकेच्या 'फर्स्ट लेडी' मिशेल ओबामा यांची तुलना वानराशी करीत वंशद्वेष करणारी फेसबुक पोस्ट करणारे क्ले शहराचा महापौरांनी राजीनामा दिला, तर एका पदाधिकारी महिलाही पदावरून बाजूला झाली आहे. 

पामेला रॅमसे टेलर या येथील क्ले काऊंटी विकास महामंडळाच्या संचालक आहेत. त्यांनी फेसबुकवर लिहिले की, "व्हाईट हाऊसमध्ये अभिजात, सुंदर आणि प्रतिष्ठित फर्स्ट लेडी उत्साहवर्धक आहे. उंच टाचांच्या चपलांमध्ये बिनशेपटीचे माकड पाहण्याचा मला कंटाळा आलाय."
पामेला यांनी अशी फेसबुक पोस्ट केल्याचे छायाचित्र काही माध्यमांनी प्रसिद्ध केले. 

वेस्ट व्हर्जिनियातील क्ले शहराचे महापौर बेव्हरली व्हेलिंग यांनी त्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, 'पाम, तुम्ही (या पोस्टने) तर माझा दिवस आनंदी केलात.' संबंधित पोस्टच्या चित्रात (स्क्रीनशॉट) व्हेलिंग यांची ती कॉमेंटही दिसत आहे.  

या पोस्टवरून खळबळ उडाल्यानंतर महापौर व्हेलिंग यांनी राजीनामा दिला. राजीनाम्याच्या वृत्ताला क्ले काऊंटीचे आयुक्त ग्रेग फित्झवॉटर यांनी दुजोरा दिला. दरम्यान, पामेला यांनी राजीनामा दिला की त्यांना काढून टाकण्यात आले हे स्पष्ट झाले नाही.