पाकिस्तानवर निर्बंध लादणार नाही: अमेरिका

पीटीआय
बुधवार, 7 सप्टेंबर 2016

वॉशिंग्टन - दहशतवादी संघटनांविरोधात समाधानकारक कारवाई न केल्याबद्दल पाकिस्तानवर निर्बंध लादण्याचा कोणताही विचार सध्या नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

वॉशिंग्टन - दहशतवादी संघटनांविरोधात समाधानकारक कारवाई न केल्याबद्दल पाकिस्तानवर निर्बंध लादण्याचा कोणताही विचार सध्या नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रसंघामधील माजी राजदूत झलमाय खलिझाद यांनी पाकिस्तानवर निर्बंध लादण्यासंदर्भातील पर्यायाचा अमेरिकेने आता गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत नुकतेच व्यक्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्‍नास उत्तर देताना टोनी यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. मात्र 26/11 सहित इतर सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात पाकिस्तानने कारवाई केलीच पाहिजे, यात कोणतीही शंका नसल्याचेही टोनी यांनी सांगितले. 

""या दहशतवादी हल्ल्यांत अमेरिकन नागरिकांनीही प्राण गमावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादविरोधी सहकार्यास अमेरिकेकडून अनेक वर्षांपासून पाठिंबा देण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तान व भारतामधील माहितीच्या देवाणघेवाणीचाही समावेश आहे. यामुळेच पाकिस्तानच्या शेजारी देशांमध्ये हल्ले घडविणाऱ्या दहशतवादी संघटनांविरोधात पाकिस्तानकडून कारवाई व्हायलाच हवी,‘‘ असे टोनी म्हणाले.

ग्लोबल

इस्तंबूल - कतारमधून तुर्कस्तानने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी अरब देशांनी केलेली मागणी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप इर्दोगान...

04.03 AM

काबूल - अफगाणिस्तानमधील हेरात प्रांतामध्ये भारताकडून बांधण्यात आलेल्या "सलमा'...

रविवार, 25 जून 2017

लंडन - जगप्रसिद्ध नाटककार शेक्‍सपिअर यांच्या "मॅकबेथ' या विख्यात नाटकावर आधारित...

रविवार, 25 जून 2017