Skin Ailments : तुम्हाला त्वचारोग आहे? मग, 'या' गोष्टी खाणं टाळा

 skin ailments
skin ailmentsesakal
Summary

आयुर्वेद डॉक्टरांनी त्वचेच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत.

त्वचारोग कसा होतो?

तुम्हाला त्वचारोग (Vitiligo) हा अंतर्गत आणि बाह्य संसर्गामुळे होतो. त्याचे अनेक प्रकार असतात. खासकरुन महिलांना (Women) जर त्वचारोग झाला, तर तो कधीकधी त्याच्या नैराश्याचे कारण देखील बनतो. कारण, आता जगात तुम्ही कसे दिसता याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येकाला वाटत मी सुंदर दिसावं, पण कधी-कधी त्वचारोग तुमचा सुंदरपणा हिरावून घेतो.

त्वचारोग म्हणजे काय?

ऋतू संक्रमणाच्या काळात जवळजवळ प्रत्येकाला खाज, पुरळ यासारख्या त्वचेशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. पण, काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्याचा धोका टाळता येतो. थोडक्यात काय तर त्वचेशी संबंधित आजारांना त्वचारोग म्हणतात. संक्रमण, अॅलर्जी, रसायने (मेकअप उत्पादने), कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. दाद, खरुज, खाज, सोरायसिस, पांढरे डाग, रोग बहुतेक त्वचेच्या आजारांमध्ये उद्भवतात. त्वचेशी संबंधित आजारांवर उपचार करणं जरी शक्य असलं, तरी ते पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच कालावधी लागतो.

याबाबत आयुर्वेद डॉक्टरांनी त्वचेच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत. त्यामुळे त्वचेचे आजार लवकर दूर होण्यास मदत होते. त्या म्हणतात की, त्वचेशी संबंधित आजार पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र, यादरम्यान तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा स्थितीत त्वचारोग असलेल्या रुग्णांनी काही अन्नपदार्थ खाणे कटाक्षाने पाळावे. हे अन्नपदार्थ त्वचारोग असलेल्या रुग्णांच्या समस्या वाढवू शकतात.

 skin ailments
कॉमिक बुक आर्टिस्ट टिम सेल यांचं निधन; 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

1) मसालेदार पदार्थ खाणे टाळावे : डॉक्टर सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला त्वचेचा आजार असेल तर त्याने मसालेदार पदार्थ आणि जंक फूड खाणे टाळावे. हे पदार्थ शरीरात दीर्घकाळ राहतात आणि पचनप्रक्रियेत व्यत्यय आणतात. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.

2) दुधजन्य पदार्थापासून जिभेला दूर ठेवावे : त्वचेच्या रुग्णांसाठी दुग्धजन्य पदार्थ देखील फायदेशीर नाहीत. आयुर्वेदानुसार त्वचेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी दूध, दही, लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये. ते पचायला जास्त वेळ लागतो. त्याचे दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर अनेक प्रकारे दिसून येऊ लागतात.

3) आंबट पदार्थ देखील समस्या वाढवू शकतात : आयुर्वेद तज्ञ सांगतात की, आयुर्वेदानुसार आंबट पदार्थ शरीरात पित्त वाढवतात. शरीरात जर पित्ताचे प्रमाण जास्त झाले तर ते आपल्या शरीरातील रक्त अशुद्ध करण्याचे काम करते. त्याचा परिणाम त्वचेशी संबंधित आजारांमध्ये दिसून येतो.

4) तीळ खाणे टाळावे : त्वचेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी तिळाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. याच्या अतिरेकामुळे पचनसंस्थेमध्ये असंतुलन आणि शरीरातील पोटावरील चरबी वाढू शकते.

5) अतिगुळाचे सेवनही घातक आहे : आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, आयुर्वेदानुसार गुळाच्या अतिसेवनाने त्वचारोगाच्या रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. त्याचा अतिरेक देखील आंबट पदार्थांप्रमाणे अशुद्ध रक्त म्हणून काम करतो. त्यामुळे तुम्हाला जर काही त्वचारोग असेल तर वरील अन्न पदार्थ खाणे टाळा आणि योग्य त्वचारोग तज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेत रहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com