weight loss
weight lossesakal

महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन

वजन कमी करण्यासाठी लोकं विविध उपाय करतात
Summary

डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच डाएट प्लॅन तयार करा. कारण अनेक लोकांना एका महिन्यात असे वजन कमी करण्यामुळे शरीरात समस्या निर्माण होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या तब्येतीनुसार डॉक्टर वजन कमी करण्याचा सल्ला देतात.

weight loss diet : सध्या अनेक लोकं वजन वाढत असल्यामुळे वैतागलेले आहेत. सतत धावपळीचे आयुष्य (Lifestyle) आणि तणावामुळे लोकांचे वजन वाढणे (Weight Gain) आता सामान्य झाले आहे. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोकं विविध उपाय करतात. काही जण घरगुती उपायांवर भर देतात. पण तरीही त्यांचे वजन काही कमी होत नाही. पण तुम्ही योग्य डाएट प्लॅन (Diet) केलात तर तुम्ही एका महिन्यात बरेच वजन कमी करू शकता. यासाठी मुंबईच्या मसिना हॉस्पिटलच्या क्लिनिकल डायटेशियन डॉ. अनम गोलांदाज यांनी डाएट प्लॅन दिला आहे.

weight loss
Water Weight म्हणजे काय? यामुळे वाढलेलं वजन असं करा कमी

त्या म्हणतात, एका आठड्यात २ ते ३ किलो वजन सहज कमी करता येऊ शकते. पण निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी आहारासोबतच व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच स्वत:ला कार्यमग्न ठेवणे गरजेचे आहे. हेल्दी डाएट(Diet), व्यायाम आणि अनहेल्दी पदार्थ खाणं टाळलं तर तुम्ही सहज महिन्याला ५ किलो वजन कमी करू शकता. त्यासाठी चार आठवड्यांचा योग्य डाएट प्लॅन पाळणं गरजेचं आहे. ओन्लीमायहेल्थने याबाबत माहिती दिली आहे

weight loss
ओट्स की कॉर्न फ्लेक्स! नाश्त्यासाठी योग्य पौष्टीक पर्याय कोणता?
Diet Plan For Weight Loss
Diet Plan For Weight Lossesakal

पहिला आठवडा

दिवसाची सूरुवात - मेथीचे पाणी प्या. (रात्री एक पाण्यात २ चमचे मेथी भिजवून ठेवा.)

नाश्ता- २ इडल्या एक वाटी सांबारबरोबर, ग्रीन टी आण चार बदाम

मध्ये खायची इच्छा असल्यास- एक वाटी फळे

दुपारचे जेवण- २ पोळ्या, १ वाटी आमटी, १ वाटी सॅलेड, जेवणानंतर अर्ध्या तासांनी ताक प्यावे.

मधल्यावेळचे खाणे - एक कप उकडलेले मूग किंवा गाजराचे सॅलेड

रात्रीचे जेवण- १ ते २ पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी लॉ फेट दही, एक वाटी सॅलेड

झोपताना- रात्री झोपताना हळदीचे दूध प्या.

weight loss
३ सेकंद व्यायाम केल्याने वाढते स्नायूंची ताकद, अभ्यासात स्पष्ट
नारळ पाणी
नारळ पाणी

दुसरा आठवडा-

दिवसाची सुरूवात- मेथी किंवा चिया सीड्सचे पाणी

नाश्ता- २ मुगाची धिरडी,ग्रीन टी, ४ बदाम

मध्ये खायची इच्छा असल्यास- एक वाटी मौसमी फळ

दुपारचे जेवण - २ पोळ्या, १ वाटी भाजी, १ वाटी सॅलेड, १ वाटी लॉ फेट दही

मधल्यावेळचे खाणे - नारळाचे पाणी

रात्रीचे जेवण- २ पोळ्या, अर्धी वाटी मशरूम करी, अर्धा वाटी पालकाचे सूप किंवा पातळ भाजी

झोपताना- रात्री झोपताना हळदीचे दूध प्या.

weight loss
व्यायाम, डाएट न करता होईल वजन कमी, शास्त्रज्ञांनी शोधला नवा उपाय
Dark Chocolate
Dark Chocolate esakal

तिसरा आठवडा

दिवसाची सुरूवात- एक कप आवळा ज्यूस किंवा लिंबू पाणी

नाश्ता- एक वाटी ओट्स, ग्रीन टी, चार बदाम किंवा अक्रोड

मध्ये खायची इच्छा असल्यास- एक कप फळांचा ज्यूस

दुपारचे जेवण- अर्धा वाटी भात, १ वाटी राजमा, १ वाटी सॅलेड, २० मिनिटानंतर ताक प्या.

मधल्यावेळचे खाणे - एक फळ

रात्रीचे जेवण- २ पोळ्या, अर्धा वाटी आमटी, डार्क चॉकलेटचा तुकडा

रात्री झोपताना- गरम दूध

weight loss
तुमचा डाएट प्लॅन असा आखा! वजन होईल कमी
Milk Drinking
Milk DrinkingSakal

चौथा आठवडा

दिवसाची सुरूवात- लिंबू पाणी

नाश्ता- अर्धी वाटी उपमा, ग्रीन टी, २ बदाम

मध्ये खायची इच्छा असल्यास- आवडते १ फळ

दुपारचे जेवण- २ पोळ्या, १ वाटी भाजी, १ वाटी आमटी, अर्धा वाटी सॅलेड, अर्धी वाटी लॉ फॅट दही.

मधल्यावेळचे खाणे - नारळाचे पाणी

रात्रीचे जेवण- १ पोळी, १ वाटी आमटी, अर्धी वाटी उकडलेल्या भाज्या.

रात्री झोपताना- गरम दूध

weight loss
अंड की पनीर ! वजन कमी करण्यासाठी प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

महत्वाचे- जर तुम्हालाही अशापद्धतीने वजन कमी करायचे असेल तर डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच डाएट प्लॅन तयार करा. कारण अनेक लोकांना एका महिन्यात असे वजन कमी करण्यामुळे शरीरात समस्या निर्माण होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या तब्येतीनुसार डॉक्टर वजन कमी करण्याचा सल्ला देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com