Google वर सेक्स बाबत ही प्रश्न सर्वाधिक Search केली जातात..

सेक्सवरील हे प्रश्न लोकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले.
the most searched questions about sex on google
the most searched questions about sex on google sakal

लैंगिकतेबाबत योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही याबद्दल जितके जागरूक असाल तितके चांगले. सेक्स एज्युकेशन हा खरं तर गरजेचा विषय आहे. सेक्सचे फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी लोक अनेकदा गुगलची मदत घेतात. आज आम्ही तुम्हाला सेक्सवरील प्रश्न यादी दाखवण्याचा प्रयत्न केला ज्यांना लोकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले.

the most searched questions about sex on google
किडनी स्टोनची समस्या सेक्समुळे होणार दुर, वाचा, संशोधन काय म्हणतं

सेक्स चांगला का वाटतो?

या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी गुगलवर सर्च केले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करतो तेव्हा त्याला मानसिकदृष्ट्या चांगलं वाटतं. डोपामिन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन यांसारख्या हार्मोन्सच्या उत्सर्जनामुळे तुम्हाला खूप छान वाटते.


सेक्सशी संबंधित स्वप्ने पडणे योग्य आहे का?

लोक अनेकदा Google वर हे प्रश्न देखील शोधतात. अगदी, जर तुम्हाला सेक्सची तीव्र इच्छा असेल, तर ती मिळवण्याची उर्मी आणखी वाढते. मानसशास्त्रीयदृष्ट्या, आपली स्वप्ने आपल्या इच्छांवर आधारित असतात. म्हणूनच सेक्सबद्दल विचार करणे किंवा स्वप्ने पाहणे ही अगदी साहजिक गोष्ट आहे.

the most searched questions about sex on google
World No Tobacco Day 2022 : धूम्रपान तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकते

जर तुम्हाला STD असेल तर काय करावे ?

लैंगिक संक्रमणाचा आजार (sexually transmitted disease) तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जर तुम्हाला लैंगिक अवयवाभोवती खाज सुटणे, जळजळ होणे किंवा संसर्ग असतील, तर त्याची तपासणी आणि उपचारांसाठी त्वरित डॉक्टरांशी किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सेक्सची वेळ कशी वाढवायची? -

हा प्रश्न गुगल सर्च लिस्टमध्येही टॉपवर आहे. ज्यांना फास्ट एजाक्यूलेशनची समस्या आहे, त्यांनी एक सोपा सराव केला पाहिजे. सेक्सची वेळ वाढवण्यासाठी, डॉक्टर विविध तंत्राचा अवलंब करण्यास सांगतात.

the most searched questions about sex on google
Sex Education संदर्भात मुलांसोबत बोलायचंय? या टिप्स फॉलो करा, संकोच वाटणार नाही

किती वेळा सेक्स करावा?

हा प्रश्न गुगलवरही अनेकदा सर्च केला गेला आहे. जोडप्यांनी किती वेळा सेक्स करावा याबाबत कोणतीही विशिष्ट संख्या किंवा स्केल निश्चित करण्यात आलेला नाही. हे फक्त जोडप्यांच्या समजुतीवर, प्रेमावर आणि आरामावर अवलंबून असते. काही लोक दिवसातून दोन किंवा तीन वेळा सेक्स करतात, तर काहींना महिन्यातून फक्त दोनदाच सेक्स करता येतो, पण तरीही त्यांच्यात खूप प्रेम असते.

प्रेग्नेंसी टाळण्यासाठी प्रोटेक्शन विश्वसनीय आहे का? -

हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशी अनेक गर्भनिरोधक उत्पादने आहेत जी गर्भधारणा रोखू शकतात. उदाहरणार्थ, कंडोम किंवा गर्भनिरोधक गोळ्या. सेक्स दरम्यान कंडोम हा नेहमीच सुरक्षित पर्याय मानला जातो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com