भविष्य

मेष:
तुमचे महत्त्वाचे निर्णय अचूक ठरतील. अंदाज बरोबर येणार आहेत. दिवस प्रसन्नतेत जाईल.
वृषभ:
जुने येणे, उधारी वसूल होईल. प्रवास सुखकर होतील. प्रॉपर्टीला, गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.
मिथुन:
अपेक्षित पत्र व्यवहार, फोन होतील. गाठीभेटी, परिचय होतील. नातेवाइकांचे चांगले सहकार्य लाभेल.
कर्क:
काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. शत्रुपीडा नाही.
सिंह:
तुम्हाला नवा मार्ग दिसेल. नवी दिशा सापडेल. मुलामुलींसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
कन्या:
महत्त्वाच्या कामांसाठी दिवस चांगला नाही. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. खर्च वाढणार आहेत.
तूळ:
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. नवीन परिचय होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.
वृश्चिक:
तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
धनु:
आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. जबाबदारी वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य म्हणावे असे लाभणार नाही.
मकर:
जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत.
कुंभ:
अपेक्षित पत्र व्यवहार व फोन येतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. कामे मार्गी लागतील.
मीन:
सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या विचारांचा व मतांचा प्रभाव पडणार आहे. महत्त्वाचे निर्णय नकोत.
रविवार, जून 17, 2018 ते शनिवार, जून 23, 2018
मेष:
अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह वास्तुयोगाचा. ता. १८ व १९ हे दिवस विशिष्ट करारमदारांद्वारे फलदायी होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट स्पर्धा परीक्षांसंदर्भात उल्लेखनीय. नोकरीत बढतीची चाहूल. स्त्रीशी अकारण वाद शक्‍य.
वृषभ:
सप्ताह शुक्र-मंगळाच्या योगातून मोठ्या चैनीचा-करमणुकीचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती उंची खरेदी करतील. ता. २० व २१ हे दिवस अतिशय गतिमान. नोकरीत कौतुक होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारची संध्याकाळ थोरा-मोठ्यांच्या सहवासाची.
मिथुन:
सप्ताहात अनेक माध्यमांतून चर्चेत राहणारी रास. तरुणवर्गाच्या भाग्योदयाचा काळ. ता. २१ ते २३ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना फोटोफिनिश यश. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल. परदेशी नोकरी.
कर्क:
सप्ताहात अपवादात्मक पार्श्‍वभूमीवर यश मिळेल. गुरुवारी सूर्योदयी सुवार्ता मिळेल. नवपरिणितांना खूशखबर. पतीला वा पत्नीला उत्तम नोकरी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह जनसंपर्कातून अत्यंत प्रवाही. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारची संध्याकाळ भन्नाट.
सिंह:
या सप्ताहात गुरुभ्रमणाचा एक टप्पा राहील. तरुणांना सर्वच बाबतीत साथ मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना कर्जफेडीतून आनंद. ता. १८ व १९ हे दिवस मघा नक्षत्राच्या व्यक्तींना झकासच. नोकरीतलं वातावरण अनुकूल होईल. आवडीचा प्रोजेक्‍ट मिळेल. घरात प्रिय व्यक्तींचे विवाह ठरतील. गुरुवार एकूणच प्रसन्न. मिष्टान्न झोडाल!
कन्या:
सप्ताहातली एक लाभसंपन्न रास राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचा अधिकार वाढेल. मुला-बाळांचे विवाह ठरवाल. ता. २१ व २२ हे दिवस एकूणच मस्त. शुभ ग्रहांचं पॅकेज अस्तित्वात राहीलच. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रांकडून लाभ. कर्जवसुली होईल.
तूळ:
शुभ ग्रहांची सरशी राहीलच. विशिष्ट विजयी चौकार-षटकार अपेक्षित आहेत. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट द्विग्विजयी करेल. तरुणांनो, संधींसाठी दबा धरून बसा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बलवत्तर विवाहयोग. सप्ताहाचा शेवट सुगंधित क्षणांचा!
वृश्चिक:
नवा श्वास घ्याल! मृद्‌गंधातून प्रसन्न व्हाल. शुभ ग्रहांची मोठी गोड खेळी राहील. स्त्रीच्या नाजूक पाशात अडकाल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह पर्वणीसारखा. घरात कार्यं ठरतील. मुला-बाळांच्या सुवार्ता. व्यावसायिक कर्जवसुली. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.
धनु:
हा सप्ताह व्यावसायिक विक्रमाचा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींच्या जिवात जीव येईल. ता. १८ व १९ हे दिवस चमत्कार घडवणारे. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम विवाहस्थळं येतील. गुरुवार नोकरीतल्या उत्तम घडामोडींचा. बदली करून घ्याल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खर्चाचा.
मकर:
राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये तुमच्या राशीचा शेअर एकदम वाढेल. शुक्रभ्रमणाचं एक पॅकेज अस्तित्वात राहीलच. मुलाखतींद्वारे प्रभाव टाकाल. होतकरू तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी येतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती ‘बाजीगर’ होतील! नोकरी मिळेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मान-सन्मानाचा.
कुंभ:
बुध-गुरू शुभयोगाचा मोठा लाभ घ्याल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी ग्रहांचं फील्ड धावसंख्या रचू देईल. कलंदर व्यक्तींचा सहवास घडेल. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनातून लाभ. मात्र, नका अडकू स्त्रीच्या संमोहनात. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ चा दिवस यशाचा. फ्लॅश न्यूज द्याल!
मीन:
हा सप्ताह ग्रहसमीकरणं अर्थातच ग्रहांची गणितं उत्तम ठेवेल. व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. नुकसान भरून काढाल. ता. २० व २१ हे दिवस भरगच्च लाभाचे. सहवासातल्या प्रिय व्यक्तींचे मोठे समारोह होतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धा परीक्षांतून यश. नोकरीच्या मुलाखती होतील.

ताज्या बातम्या