भविष्य

मेष:
नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. प्रॉपर्टी, गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग येतील.
वृषभ:
आर्थिक परिस्थिती चांगली राहाणार आहे. मुलांचे सौख्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल.
मिथुन:
विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. उत्साह, उमेद वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कर्क:
गरोदर स्त्रियांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. शासकीय कामे मार्गी लागतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सिंह:
कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कन्या:
खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. ग्रह प्रतिकूल आहेत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे.
तूळ:
तुमच्या जीवनात वैचारिक परिवर्तनाची शक्‍यता आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळणार आहे.
वृश्चिक:
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत पगारवाढीची शक्‍यता आहे.
धनु:
कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. जीवनामध्ये एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर:
एखादी मानसिक चिंता राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. भागीदारी व्यवसायात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
कुंभ:
मित्रांचे, वरिष्ठांचे, नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.
मीन:
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना बढतीची शक्‍यता आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
रविवार, ऑक्टोबर 14, 2018 ते शनिवार, ऑक्टोबर 20, 2018
मेष:
विवाहविषयक गाठीभेठी करा सप्ताहातील बुध, शुक्र सहयोग अश्‍विनी नक्षत्रास अतिशय शुभफलदायी होईल. विवाहविषयक गाठीभेठी करा. भरणी नक्षत्रास नोकरी व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर मोठी भाग्यलक्षणं दिसतील. ता. 17 व 18 हे दिवस मोठ्या सुवार्तांचे. व्यावसायिक झगमगाट आणि उत्सव प्रदर्शन.
वृषभ:
नवरात्रात गोड बातमी ता. 18 ऑक्‍टोबर विजयादशमी एक उत्तम मुहूर्त राहील. सूर्योदयी सुवार्तांचा भर. पुत्रोत्कर्ष. काहींचे नूतन वास्तूप्रवेशातून सीमोल्लंघन. कृत्तिका नक्षत्र तारुण्याच्या ऐन भरात येण्यास सुरवात होईल. मृग नक्षत्राचं परदेशात मीमोलंघन होईल. रोहिणी नक्षत्रव्यक्तींना नवरात्रात गोड बातमी.
मिथुन:
बौद्धिक उपक्रमातून मोठी झेप नवरात्रोत्सवात मोठे धनवर्षाव अपेक्षित आहेत. शिवाय प्रिय बांधवांच्या सुवार्तांतून जल्लोष साजरा कराल. आर्द्रा नक्षत्रव्यक्तींना ता. 18 ते 20 ऑक्‍टोबर हे दिवस बुध-शुक्रांच्या खेळीतून आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवतील. कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमातून मोठी झेप गाठाल. मृग नक्षत्रास जीवन सहचरीचा लाभ!
कर्क:
सरकारी मोठी कामं होतील आपला रुबाब प्रचंड वाढणारा आहे. पुनर्वसू नक्षत्रव्यक्तींना यंदाचं नवरात्र ऐश्‍वर्याकडं नेणारं. काहींचे नूतन वास्तूप्रवेश होतील. पुष्य नक्षत्राच्या गृहिणींना हे नवरात्र घरात समाधानाची संपत्ती देईल. आश्‍लेषा नक्षत्रव्यक्ती राजकीय सीमोल्लंघन करतील. सरकारी मोठी कामं होतील.
सिंह:
मित्रांकडून मोठी कामं होतील शुभग्रहांची मंत्रालयं सतत आपणासाठी उघडी राहतील. सप्ताहातील बुध-शुक्र सहयोग तरुणांना अतिशय उत्तम पार्श्‍वभूमी ठेवेल. मित्रांकडून मोठी कामं होतील. विवाहाच्या बाबतीत नकळत काही घडेल! पूर्वा नक्षत्रास ता. 18 ते 20 हे दिवस उत्तम पॅकेजचे.
कन्या:
वैवाहिक जीवनात सुवार्ता नवरात्रात अर्थातच विजयादशमीच्या आसपास आपल्यातील भीती पूर्णपणे पळून जाईल. उत्तरा नक्षत्राच्या तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी येतील. ओळखी मध्यस्थी क्‍लिक होतील. हस्त नक्षत्राच्या नवपरिणितांना वैवाहिक जीवनातील सुवार्ता धन्य करतील. पती वा पत्नीचा मोठा भाग्योदय. कर्जफेड.
तूळ:
आकर्षणाचे केंद्रबिंदू बनाल राशीचे बुध, शुक्र ग्रहांचा पट ताब्यात घेतील. आपल्या विशिष्ट यशातून सतत आकर्षणाचे केंद्रबिंदू बनाल. व्यावसायिक नवे पर्याय जबरदस्त क्‍लिक होतील. स्वाती नक्षत्रव्यक्ती मुलाबाळांच्या भाग्योदयातून धन्य होतील. विजयादशमीचा दिवस विशाखा नक्षत्रास मोठी भाग्यबीजं पेरणारा.
वृश्चिक:
जीवनात सीमोल्लंघनाच्या संधी यंदाची विजयादशमी ज्येष्ठा नक्षत्रव्यक्तींना पुन्हा एकदा हत्तीचं बळ देणार आहे. जीवनात सीमोल्लंघनाच्या संधी चालून येणार आहेत. अनुराधा नक्षत्रव्यक्तींना विवाहयोग. काहींची मोठी व्यावसायिक वसुली. ता. 17 ची दुर्गाष्टमी चिंता घालवणारी.
धनु:
मन स्वच्छ ठेवा नवरात्रातील दिवस शुभग्रहांच्या नाजूक स्पंदनाचे. आपलं मन स्वच्छ ठेवा, म्हणजे स्पंदनं निश्‍चितच जाणवतील. ता. 17 ते 19 हे दिवस नकळत काही सुंदर घडवणारे. पूर्वाषाढा नक्षत्रांच्या तरुणांचं शिक्षण, नोकरी वा विवाह इत्यादी घटकांतून विशिष्ट भाग्य उलगडेल.
मकर:
स्त्रीमुळं भाग्य उलगडेल सप्ताहातील बुध, शुक्रांच्या फिल्डवर राशीचा मंगळ अतिशय अप्रतिम फळं देईल. श्रवण नक्षत्रव्यक्तींना जीवनाचा एक महामार्ग गवसेल. ता. 17 ते 19 ऑक्‍टोबर हे दिवस चमत्कार घडवणारे. उत्तरषाढा नक्षत्रव्यक्तींना विजयादशमी सीमोल्लंघनाची. स्त्रीमुळं भाग्य उलगडेल. धनिष्ठास राजकीय पद.
कुंभ:
पुत्रोत्कर्षातून धन्य व्हाल सप्ताहातील पडद्यामागची सूत्रधार राहणारी रास. शततारका नक्षत्रव्यक्ती आपला अधिकार गाजवतील. सप्ताहाची सुरवात विजयी चौकार षटकारातून होईल. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींना ता. 18 ते 20 हे दिवस उत्सवसमारंभातून मिरवतील. पुत्रोत्कर्षातून धन्य व्हाल.
मीन:
महत्त्वाचे दूरध्वनी येतील कौटुंबिक पार्श्‍वभूमीवर एक प्रकारच्या उबदार कोशात ठेवणारा सप्ताह. पूर्वाभाद्रपदा व्यक्ती लाड करुन घेतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या तरुणांना ता. 18 ची विजयादशमी मोठी भाग्यसूचक. महत्त्वाचे दूरध्वनी येतील. रेवती नक्षत्राचे कळत-नकळत प्रेमाचे धागे गुंफले जातील.

ताज्या बातम्या