भविष्य

मेष:
शुभ कार्यासाठी दिवस प्रतिकूल आहे. कोणतेही महत्त्वाचे काम पुढे ढकलावे. प्रवास नकोत. हितशत्रूंचा त्रास जाणवण्याची शक्‍यता आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही.
वृषभ:
उत्साह, उमेद वाढेल. शासकीय कामात यश मिळेल. गाठीभेटी, परिचय होतील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहील.
मिथुन:
महत्त्वाची कामे पुढे ढकला. मानसिक चिंता राहणार आहे. अडचणी वाढणार आहेत. अनेकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत.
कर्क:
शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना सुयश लाभेल. गाठीभेटी, परिचय होतील. सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
सिंह:
प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसाय वाढणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे. नवीन परिचय होतील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक येतील.
कन्या:
मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगली प्रसिद्धी लाभणार आहे. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. गाठीभेटी, परिचय होतील.
तूळ:
व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. काहींची पगारवाढीची शक्‍यता आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. विरोधकावर मात कराल.
वृश्चिक:
तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. अडचणीवर मात कराल. कौटुंबिक सौख्य चांगले लाभणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.
धनु:
कोणत्याही कामामध्ये यशाची अपेक्षा करू नका. मानसिक चिंता राहील. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभणार नाही. त्यांच्याशी मतभेदाची शक्‍यता आहे.
मकर:
आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. नवीन परिचय होतील. शासकीय कामात यश लाभेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. मित्रांचे, नातेवाईकांचे व थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
कुंभ:
तुमच्या कर्तृत्वाला संधी मिळणार आहे. व्यवसायात वाढ करण्यात यशस्वी व्हाल. काहींना प्रवासाचे योग येतील. नोकरीमध्ये चांगली स्थिती राहणार आहे. बढतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
मीन:
नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. काहींना प्रवासाचे योग येतील. कला, संगीत, नाट्य, साहित्य या क्षेत्रातील व्यक्‍तींना चांगली संधी लाभणार आहे, प्रसिद्धी लाभणार आहे.
रविवार, ऑक्टोबर 22, 2017 ते शनिवार, ऑक्टोबर 28, 2017
मेष:
या सप्ताहात अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-गुरू योगातून काही भारदस्त फळं मिळतील. नोकरीतला दबदबा वाढेल. ता. २५ व २६ हे दिवस सर्वच बाबतींत छाप पाडणारे. हुकमी कामं होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना २४ चा मंगळवार यंत्रपीडेचा. वाहनांचा त्रास. विचित्र खर्च.
वृषभ:
रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य बाधेतून त्रास. पोटाचे विकार त्रास देतील. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या अखेरीस सुवार्ता मिळतील. वास्तुयोग. ओळखी-मध्यस्थीतून मोठे लाभ वा भाग्योदयाच्या संधी. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दंतपीडा. भावंडांशी मतभेदांची शक्‍यता.
मिथुन:
रवी-गुरू योगाचं अधिष्ठान राहील. रेंगाळलेली विशिष्ट कामं होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस स्वैर फलंदाजीचे! नोकरीत कामाचा आनंद मिळेल. विवाहप्रस्ताव येतील. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ असं करू नका! मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा प्रवास घडेल.
कर्क:
घरातल्या तरुणवर्गानं भावनांवर ताबा ठेवावा. काहींच्या विवाहविषयक प्रश्‍नांतून त्रास शक्‍य. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरं जावं लागण्याची शक्‍यता. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २७ व २८ हे दिवस आत्यंतिक प्रवाही. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार.
सिंह:
रवी-गुरू योगाच्या ट्रान्स्फॉर्मरमधून प्रचंड ऊर्जा खेचून घेणार आहात. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नियोजनबद्ध रीतीनं मोठं यश मिळेल. ता. २५ व २६ हे दिवस तरुणांना स्पर्धा परीक्षांतून मानांकन देतील. काहींना उत्तम सरकारी नोकरी मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचं कर्ज फिटेल.
कन्या:
या सप्ताहात अतिशय संमिश्र स्वरूपाची फळं मिळण्याची शक्‍यता. भांडणात पडू नका. बेकायदेशीर व्यवहारात फसू नका. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची फसवणुकीची शक्‍यता. मित्रसंगत जपा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचा लाभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट गोड बातम्यांचा. नव्या ओळखी होतील.
तूळ:
रवी-गुरू शुभयोग साडेसातीचा स्विच पूर्णपणे ऑफ करणार आहे. जीवनाची पॅसेंजर ‘राजधानी’चा वेग पकडेल. तुम्ही दिल्ली काबीज करणार आहात, याचीच खात्री सप्ताहाचा शेवट देईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात देवलोकाशी कनेक्‍टिव्हिटी साधतील!
वृश्चिक:
राशीतून शनिमहाराज हलणार आहेत. शिवाय, रवी-गुरू योगाची विशिष्ट शुभ फळं तुम्हाला मिळालीच पाहिजेत! ता. २७ व २८ ऑक्‍टोबर हे दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचे. मात्र, ता. २४ ची संध्याकाळ ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र चिंता-काळजीतून छायाग्रस्त करू शकेल. वेदनायुक्त आजार.
धनु:
शनीचं राशीत आगमन होईल. अजिबात घाबरू नका! सप्ताहात रवी-गुरू शुभयोगाची कवचकुंडलं तुम्हाला मिळणार आहेत. आचारसंहिता मात्र पाळू लागा. ता. २४ ची संध्याकाळ मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना याचीच जाणीव करून देईल. बाकी सप्ताहाचा शेवट मोठा भन्नाट. धनलाभ.
मकर:
सप्ताहात शनीचं राश्‍यंतर होऊन एक प्रकारचा सायरन वाजेल. ता. २४ ते २६ हे दिवस धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बेरंग करणारे ठरू शकतात. उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस अतिशय प्रवाही आणि लाभप्रद. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी मिळेल.
कुंभ:
या सप्ताहात एखादी मॅरेथॉन जिंकाल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-गुरू योगाच्या ट्रान्स्फॉर्मरमधून प्रचंड ऊर्जा मिळणार आहे. ता. २५ व २६ हे दिवस मोठ्या फोटोफिनिश विजयाचे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अपत्यलाभ. विवाहयोग. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी मंगळवारी चीजवस्तू जपाव्यात.
मीन:
हा सप्ताह संमिश्र स्वरूपात फलदायी होणारा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना एखाद्या मानवी दहशतीतून त्रास होण्याची शक्‍यता. व्यावसायिक मालमत्तेची चोरी वा नुकसानी शक्‍य. काहींना पायाच्या दुखापती. सप्ताहाचा शेवट एकूणच तुमच्या राशीला कौटुंबिकदृष्ट्या शुभ. उत्तराभाद्रपदा व्यक्तींना ओळखीतून

ताज्या बातम्या