भविष्य

मेष:
जुन्या आठवणींना उजाळा देवू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करणे गरजेचे आहे.
वृषभ:
नवीन परिचय होतील. व्यवसायामध्ये नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अपेक्षित पत्र व्यवहार होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. अनुकूलता लाभेल.
मिथुन:
व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. तुमचे अंदाज व निर्णय योग्य ठरतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील.
कर्क:
नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील. आरोग्य चांगले राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.
सिंह:
काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना एखादी गुप्त वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. अनावश्‍यक प्रवास व दगदग टाळावी.
कन्या:
तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
तूळ:
विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर रहावे. कोणताही धोका पत्करू नका. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहींना सतत एखादी चिंता लागून राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक:
विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात यश लाभेल. व्यापारात उत्तम आर्थिक लाभाच्या संधी लाभतील. जुन्या आठवणींना उजाळा देवू शकाल. अनेकांच्या सहकार्याने महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळवाल.
धनु:
प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात यश लाभेल. घरात नवीन सुख समाधानाची भर पडेल. मानसन्मानाचे योग येतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर:
जिद्द व चिकाटी वाढेल. यश मिळविण्यासाठी जास्त परिश्रम घ्याल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील.
कुंभ:
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. कौटुंबिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. आरोग्य चांगले राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
मीन:
शत्रुंवर मात कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
रविवार, मार्च 18, 2018 ते शनिवार, मार्च 24, 2018
मेष:
सुखस्वप्नांच्या हिंदोळ्याचे दिवस बुध-शुक्र युतीयोगाच्या पार्श्‍वभूमीवर उगवणारं नवसंवत्सर प्रेमिकांना सहली-करमणुकींतून मोहरून टाकणार! भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 21 ते 23 हे दिवस सुखस्वप्नांच्या हिंदोळ्याचे. विवाहयोग. वास्तुयोग. सखीचा सहवास. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता.
वृषभ:
सुवार्तांचा सप्ताह...धनवर्षावाचा काळ नवसंवत्सराच्या शुभारंभी विशिष्ट सुवार्ता मिळतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 22 व 23 हे दिवस मोठ्या धनवर्षावाचे. मंत्रालयातून कामं होतील. काहींची कर्जमंजुरी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीच्या माध्यमातून परदेशगमन. व्हिसा मिळेल. प्रेयसीचे रुसवेफुगवे सतावतील!
मिथुन:
आजचा पाडवा संस्मरणीय सप्ताहात भाव खाऊन जाणारी रास! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर तुकतुकी येईल. आजचा गुढीपाडवा चांगल्या अर्थानं स्मरणात राहील. वास्तुविषयक व्यवहार होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मित्रसंगतीतून वाईट अनुभव देणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पाडवा सुग्रास भोजनाचा. विवाहयोग आहे.
कर्क:
सहकुटुंब मौज-मजा कराल आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना नवसंवत्सरारंभ पुत्र-पौत्रांविषयीच्या सुवार्तांचा. सहकुटुंब मौज-मजा कराल. ता. 21 व 23 हे दिवस एकूणच तुमच्या राशीला विशिष्ट भाग्यबीजं घेऊन येणारे. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारचा दिवस नातेवाइकांच्या "व्हायरस'पासून त्रास देणारा. संशयातून चिंता.
सिंह:
थोरा-मोठ्यांवर प्रभाव टाकाल नवसंवत्सरारंभ कलाकारांना मोठं सुलक्षणी. थोरा-मोठ्यांवर प्रभाव टाकाल, अर्थातच तुमचा शेअर वधारेल! ता. 21 ते 23 हे दिवस तुमच्या राशीला सर्वोत्तमरीत्या फलदायी होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना "खुल जा सिम सिम'चा अनुभव येईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी वृद्धांचा जाच. खाष्ट म्हातारा भेटेल!
कन्या:
हमरीतुमरीचे प्रसंग टाळा आजचा गुढीपाडवा तरुणांना विवाहविषयक घडामोडींतून रोमांचित करणारा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 22 व 23 हे दिवस शिक्षण, नोकरी व विवाह यासंदर्भात अतिशय शुभदायी. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खलनायकाच्या त्रासाचा. हमरीतुमरीचे प्रसंग.
तूळ:
प्रेमिकांचा दुरावा संपेल सप्ताह तरुणांना लाभदायीच राहील. प्रेमिकांचा दुरावा संपेल. ता. 22 व 23 हे दिवस स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी भावरम्य ठरतील. फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईड भेटेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहात मोठी व्यावसायिक उलाढाल होईल. मात्र, शनिवार कुसंगतीचा. सावध राहा.
वृश्चिक:
नोकरीतलं वर्चस्व वाढेल ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नवसंवत्सराचा आरंभ बुध-शुक्र जोडगोळीच्या खेळीतून मोठे लाभ देणारा. नोकरीतलं वर्चस्व वाढेल. ता. 22 व 23 हे दिवस अफलातून असतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार बेरंग करणारा. नको ते चेहरे दिसतील!
धनु:
घरात शांततेचं धोरण बाळगा राशीच्या मंगळाचा एक "छुपा कार्यक्रम' राहील. घरात शांत राहा. बाकी बुध-शुक्र योगाचं पॅकेज उद्योग-व्यवसायात कर्जवसुलीतून गारवा देणारं! पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं गुलगुलीत हास्य आठवडाभर टिकून राहील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा कोर्टात जय.
मकर:
दिव्यत्वाची प्रचीती येईल श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींवर श्रीविष्णू प्रसन्न होतील! ता. 22 व 23 या दिवशी तुमच्या राशीवर नक्षत्रलोकांतून पुष्पवृष्टी होईल! दिव्यत्वाची प्रचीती येईल. सिर्फ आम खाने से मतलब रखो. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या घरात या सप्ताहात शुभ कार्य ठरेल. शनिवारी प्रवासात जपा. ओव्हरटेक करू नका.
कुंभ:
जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ सप्ताहातली एक नशीबवान रास राहील. गुढी पाडव्याचा आजचा दिवस मोठा प्रसन्न असेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ. ता. 22 व 23 हे दिवस तुमच्या राशीसाठी "बहारों फूल बरसाओ'चा अनुभव देणारे! पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीच्या माध्यमातून परदेशगमन. पगारवाढ.
मीन:
विवाहप्रस्तावाचा विचार करा शुभ ग्रहांच्या अधिष्ठानातून सुगंधित लहरींचा अनुभव घ्याल. उत्तम विवाहप्रस्ताव येतील. नका बघत बसू ज्योतिष वगैरे! रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 22 व 23 हे दिवस सुवार्तांचे...आनंदाचे...हास्यकल्लोळांचे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार ठेचकाळण्याचा! चालताना काळजी घ्या.

ताज्या बातम्या