भविष्य

मेष:
अनेकांची सहकार्य लाभेल. मनोबल व उत्साह वाढणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
वृषभ:
व्यवसायात वाढ होईल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी मिळेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.
मिथुन:
नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नवे परिचय होतील. काहींना प्रवासाचे योग येतील.
कर्क:
महत्त्वाची कामे नकोत. कामाचा ताण व दगदग जाणवेल. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे.
सिंह:
कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या:
जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. कामाचा ताण जाणवेल. व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.
तूळ:
शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. गाठीभेटी व परिचय होतील. अपेक्षित पत्र व्यवहार फोन होतील.
वृश्चिक:
आरोग्याकडे लक्ष हवे. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. मनोरंजनाकडे कल वाढेल. स्वास्थ्य लाभेल.
धनु:
वरिष्ठांशी मतभेदाची शक्‍यता आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगली संधी लाभेल.
मकर:
हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
कुंभ:
नोकरीत सामान्य स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रॉपर्टी, गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.
मीन:
महत्त्वाची कामे नकोत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. नको त्या कामावर खर्च होईल.
रविवार, सप्टेंबर 16, 2018 ते शनिवार, सप्टेंबर 22, 2018
मेष:
अतिरेकी प्रवृतींपासून सावध दशमस्थ मंगळाच्या आधिपत्याखालच्या आणि तुमच्या सहवासातल्या अतिरेकी प्रवृत्तीच्या मंडळींपासून काळजी घ्या. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार आणि शुक्रवार नोकरीत कटकटीचे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवारची संध्याकाळ मोठी प्रसन्न. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय. दिलखुलास गाठी-भेटी. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ.
वृषभ:
वास्तुविषयक व्यवहार होईल सप्ताहाचे पॅकेज तरुणांसाठी अतिशय उत्तम. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. गुरुवारी व शुक्रवारी मोठी व्यावसायिक प्राप्ती होईल. कर्ज मंजूर होईल. वास्तुविषयक व्यवहार कराल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवारची संध्याकाळ घरातल्या वृद्धांच्या चिंतेची. मात्र, नोकरीत सुवार्ता. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना देवदर्शनाचा योग.
मिथुन:
आध्यात्मिक प्रगती कराल सप्ताहातली रवी-बुध योगाची पार्श्‍वभूमी अतिशय सुंदर. तुमच्या रोजनिशीत बुधवारी मोठ्या शुभ घटनांची नोंद होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना बोनस शेअर्सचा लाभ. आध्यात्मिक प्रगती कराल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार, तसंच सोमवार घरगुती उपकरणांसंदर्भात धोकादायक. विद्युत्‌उपकरणांपासून काळजी घ्या. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना श्वानदंशाची शक्‍यता.
कर्क:
मोठ्या व्यावसायिक उलाढाली सप्ताहात मंगळभ्रमणाची विशिष्ट स्थिती राहील. आजचा रविवार ते मंगळवारपर्यंतचे दिवस हाय ऍलर्ट किंवा हाय व्होल्टेजचे. महिलांनी काळजी घ्यावी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती मंगळाच्या सर्चलाईटखाली येतील! बाकी, आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार-शुक्रवार हे दिवस भन्नाट राहतील. तरुणांना परदेशगमनाचा योग. मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. कर्जवसुली. सरकारी काम मार्गी लागेल. कोर्टप्रकरण जिंकाल.
सिंह:
नोकरीत मोठा भाग्योदय या सप्ताहात सर्व प्रकारांतून मानांकन घेणारी रास! ता. 18 व 19 हे दिवस पूर्वा नक्षत्राच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवतील. नोकरीत मोठा भाग्योदय. उत्सव-समारंभातून परिचयोत्तर विवाह. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवार मोठ्या विजयश्रीचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.
कन्या:
तरुणवर्गाला बहारीचा काळ हा सप्ताह गतिमानच राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना अप्रतिमच. कर्जफेड कराल. घरात मोठ्या चीजवस्तू येतील. उत्तरा नक्षत्राच्या तरुण-तरुणी बहारीची फळं अनुभवतील. थोरा-मोठ्यांच्या ओळखींतून कामं मार्गी लागतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बुधवार अतिशय लाभदायी.
तूळ:
व्यवसायात विक्रमी प्राप्ती "आए दिन बहार के' असाच अनुभव देणारं ग्रहमान आहे. बुधवार ते शुक्रवार हे दिवस अप्रतिमच. नवपरिणितांचे संसार फुलतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह मोठ्या व्यावसायिक उलाढालींचा. विक्रमी प्राप्ती होईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार भाग्योदयाचा. कोर्टप्रकरण जिंकाल.
वृश्चिक:
नोकरीच्या मुलाखतीत यश सप्ताहात मंगळभ्रमणाची विशिष्ट स्थिती राहील. अर्थात हाता-पायाच्या दुखापतींबाबत काळजी घ्यावी. बाकी, ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-बुध सहयोगाच्या पार्श्‍वभूमीमुळं एखादं यश मिळेल. बुधवार आणि शुक्रवार हे दिवस अत्यंत प्रवाही राहतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार नोकरीच्या मुलाखतींसाठी शुभ. विवाहविषयक गाठीभेटी होतील.
धनु:
नोकरीच्या अफलातून संधी सप्ताहातला रवी-बुध सहयोग अतिशय संवेदनशील राहील. तरुण-तरुणींनो, सतत ऑनलाईन राहाच. नोकरीच्या अफलातून संधी येतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींवरचं साडेसातीचं मळभ बुधवारी हटेल. प्रसन्न आणि निरपेक्ष व्यक्तींचा सहवास घडेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक पॅकेज. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग.
मकर:
खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून सप्ताहात राशीच्या मंगळाचा लालिमा वाढणार आहे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी कायदेशीर गोष्टींचं भान ठेवावं. खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून करावेत. बाकी, श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीतलं नैराश्‍य दूर होईल. ता. 19 व 20 हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरणारे. नोकरीच्या अंतिम मुलाखती. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम प्रवासाचा योग.
कुंभ:
मोठा पराक्रम गाजवाल! सप्ताहातली नशीबवान रास! पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती मोठा पराक्रम गाजवतील. बुधवार विलक्षण सुवार्तांचा. घरात तरुणांची कार्यं ठरतील. मंगळवार शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट गुप्त चिंतेचा. मात्र, वैवाहिक जीवनात शुभदायी, तसंच होतकरूंना नोकरीचा लाभ.
मीन:
नोकरीत वाद घालू नका सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. नोकरीत वरिष्ठांशी मतभेदांची शक्‍यता. काळजी घ्या. ता. 17 व 18 हे दिवस वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराबच. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. बाकी, उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार भाग्यदायी. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचं संकट शनिवारी दूर होईल. मारुतीचं दर्शन घ्या.

ताज्या बातम्या