भविष्य

मेष:
काहींची बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांशी सुसंवाद साधाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ:
व्यवसायामध्ये महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होणार आहेत. नोकरीत उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमचा विशेष प्रभाव राहील.
मिथुन:
मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवासाचे योग येतील. जिद्दीने कार्यरत रहाल.
कर्क:
मानसिक त्रास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्‍यता आहे. मनोबल कमी राहणार आहे.
सिंह:
तुमच्या व्यक्‍मित्त्वाचा प्रभाव वाढेल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
कन्या:
खर्च वाढणार आहेत. वाहने चालवताना तसेच प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
तूळ:
महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. काहींची वैचारिक प्रगती होईल.
वृश्चिक:
मनोबल उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.
धनु:
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर:
प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
कुंभ:
महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे.
मीन:
दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहे. महत्त्वाची कामे नकोत. मानसिक अस्वस्थता राहील.
रविवार, सप्टेंबर 23, 2018 ते शनिवार, सप्टेंबर 29, 2018
मेष:
"छप्पर फाड के' मिळेल! पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी खराब. विचित्र नुकसानीच्या घटना. गृहिणींना लहान मुलांचा त्रास. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच छान. ता. 28 ची संकष्टी चतुर्थी "छप्पर फाड के' देणारी. नोकरी लाभेल आणि मैत्रीणही. भूखंड सोडवाल.
वृषभ:
एखादा गॉडफादर भेटेल कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी आशावादी राहावे. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात विशिष्ट संधी मिळतील. एखादा गॉडफादर भेटेल. ता. 23 व 24 हे दिवस जीवनातला "प्युअर सीक्वेन्स लावून देणारे. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 27 चा दिवस विचित्र खर्चाचा. स्त्रीहट्टातून त्रास.
मिथुन:
महत्त्वाची कामं हाती घ्या हा सप्ताह ग्रहांच्या मोठ्या शक्तिस्रोताचा. महत्त्वाच्या कामांचं नियोजन कराच. राशीच्या एक्‍स्चेंजमध्ये पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती मोठा खेळ खेळतील. माणसांकडून कामं करवून घेतील. ता. 24 चा दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच भाग्यबीजं पेरणारा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ.
कर्क:
विशिष्ट संशोधनातून प्रगती पौर्णिमेचा सप्ताह ग्रहांच्या शक्तिप्रदर्शनातून काही चमत्कार घडवेल. व्यासंगी व्यक्तींना सप्ताह अतिशय सुंदर. विशिष्ट संशोधनातून प्रगती. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं फील्ड स्वैर फलंदाजीला मोकळं राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी स्त्रीवर्गाशी जपून वागावं.
सिंह:
बॅंक बॅलन्स वाढणार आहे! सध्या तुम्ही जीवनातून उत्तम वाट काढत आहात. या सप्ताहात तुमच्या चातुर्याचं उत्तम प्रदर्शन होईल. सप्ताहाचा शेवट गाजवणार आहात. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात आपला बॅंक बॅलन्स वाढवणार आहेत! मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 25 चा दिवस कौटुंबिक वादाचा. गप्पा बसणं हेच हिताचं.
कन्या:
पगारवाढीची चाहूल लागेल! पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात तरुण-तरुणींना उत्तम विवाहस्थळ येतील. आतला आवाज ओळखा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात धनलाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पगारवाढीची चाहूल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार वैवाहिक जीवनात मोठा भावमधुर!
तूळ:
भाग्यप्रेरक घटना घडतील राशीचे गुरू-शुक्र आगामी दिवसांत अतिशय उत्तम खेळी खेळतील. भाग्यप्रेरक अशा घटना घडतील. ता. 23 व 24 हे दिवस अतिशय शुभलक्षणी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती आगामी दिवसांत जीवनातला मोठा कलास्वाद घेतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टीचा दिवस मोठ्या सुवार्तांचा.
वृश्चिक:
मनाचे अँटिने स्वच्छ ठेवा! पौर्णिमेच्या आसपासच्या काळात तरुणांना मोठे लाभ. प्रेमकटाक्ष मिळतील! मनाचे अँटिने स्वच्छ ठेवा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात काही विलक्षण लाभ अपेक्षित आहेत. मोठी सरकारी कामं मार्गी लागतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 27 चा दिवस एक "बॅड डे' राहील. सतत विरोध आणि विलंब! संयम बाळगा.
धनु:
थोरा-मोठ्यांचं सहकार्य पौर्णिमेजवळ रवी-शनी केंद्रयोगाचा प्रभाव राहील. सप्ताहाचा ट्रॅक विरोधीच. घरात शांत राहा. बाकी, गुरू-शुक्र यांची स्थिती ता. 28 व 29 या दिवसांत महत्त्वाच्या कामांतून क्‍लिक होणारी! पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरा-मोठ्यांचं सहकार्य मिळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना बढती.
मकर:
कुणावरही दोषारोप नकोत पौर्णिमेच्या आसपासच्या काळात ग्रहांचे विशिष्ट डावपेच तुम्हाला अडचणीत आणू शकतात. सरळ चला. नका करू कुणावरही दोषारोप. बाकी, श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांचं गुप्त सहकार्य लाभेलच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 27 व 28 हे दिवस वैचारिक गोंधळाचे. अनामिक भीती.
कुंभ:
नोकरीच्या ठिकाणी जपून राहा! पौर्णिमेजवळ रवी-शनी कुयोगाचा प्रभाव राहील. नोकरीतल्या घटकगोष्टींतून अस्वस्थ राहाल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींवर नोकरीतल्या वातावरणाचं विशिष्ट सावट राहील. जपून राहा. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती सार्वजनिक जीवनात वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट भाग्योदयाचा. मोठ्या गुंतवणुकी. वास्तुलाभ.
मीन:
सज्जनांच्या सहवासात राहा राशीतली पौर्णिमा रवी-शनी कुयोगातून होत आहे. नातेवाइकांच्या भानगडीत पडू नका. बाकी, पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभ ग्रहांचं गुप्त सहकार्य लाभेल. सज्जन व्यक्तींच्या सहवासात राहा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 27 चा दिवस प्रतिकूल राहील. वेळा सांभाळा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार धनलाभाचा. मित्रभेट.

ताज्या बातम्या