भविष्य

मेष:
व्यवसायात वाढ होईल. शासकीय कामात यश लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.
वृषभ:
उधारी वसूल होईल. निर्णय व अंदाज अचूक येतील. संततिसौख्य लाभेल. शासकीय कामात यश लाभेल.
मिथुन:
आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासकीय कामात यश मिळणार नाही. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.
कर्क:
प्रसिद्धी लाभणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रतिष्ठा लाभणार आहे. प्रगती वेगाने होणार आहे.
सिंह:
आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीची कामे नकोत.
कन्या:
तुमचे निर्णय व अंदाज अचूक येणार आहेत. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तूळ:
सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहणार आहे. गुंतवणुकीला, प्रॉपर्टीला चांगला दिवस.
वृश्चिक:
मुलांसंदर्भात चांगली घटना घडेल. आरोग्य चांगले राहणार आहे. कर्तृत्वाला संधी मिळणार आहे.
धनु:
प्रॉपर्टीव गुंतवणुकीला दिवस चांगला. व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.
मकर:
व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. मनोबल वाढेल.
कुंभ:
उधारी, उसनवारी वसूल होईल. मात्र, व्यवसायात धाडस टाळावे. प्रॉपर्टीसाठी दिवस चांगला आहे.
मीन:
तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. वरिष्ठांचे, थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कर्तृत्वाला संधी मिळेल.
रविवार, जानेवारी 21, 2018 ते शनिवार, जानेवारी 27, 2018
मेष:
व्यावसायिक धनवर्षाव ! श्रीगणेशजयंतीचा हा सप्ताह तुमच्यावर कृपेचा अगदी वर्षाव करणारा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार भाग्यबीजं पेरणारा. सप्ताह व्यावसायिक धनवर्षावाचा. भरणी नक्षत्राच्या तरुणांना ता. २४ व २५ हे दिवस नोकरीत सुवार्ता मिळण्याचे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार भाग्याचा. मोठी खरेदी होईल.
वृषभ:
नोकरीतली चिंता संपेल मकरसंक्रांतीनंतरचं शुक्रभ्रमण वसंतपंचमीचा मुहूर्त साधत उत्तमरीत्या फलदायी होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रबळातून विशेष लाभ. ता. २२ व २३ हे दिवस घरगुती पार्श्‍वभूमीवर उत्तमच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना वसंतपंचमीचा दिवस नोकरीतली चिंता घालवणारा.
मिथुन:
उत्कट प्रसंग अनुभवाल श्रीगणेशजन्माचा मुहूर्त साधत आजचा रविवार काही भाग्यसंकेत दाखवणारा. ता. २५ व २६ हे दिवस अनेक उत्कट प्रसंगांद्वारे तुम्हाला सद्‌गदित करून जातील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचा पट प्रजासत्ताकदिनी राज्याभिषेक घडवेल! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना रथसप्तमीचा दिवस उत्साहाचा, उधाणाचा!
कर्क:
कलाविष्कार प्रकट होतील प्रजासत्ताकदिनाच्या या सप्ताहात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ग्लॅमर लाभेल. शुभग्रहांच्या योगातून तुमच्यातले कलाविष्कार प्रकट होतील. रथसप्तमीचा दिवस प्रेमिकांचे धागे जुळवणारा. मोठ्या खरेदीचा योग. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार गाठी-भेटींचा.
सिंह:
नोकरीतलं लक्ष्य गाठाल वसंतपंचमीच्या या सप्ताहात चंद्रकलांना उधाण आणणारा सप्ताह. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना अप्रतिम ग्रहमान. ता. २४ ते २६ हे दिवस थोरा-मोठ्यांच्या गाठी-भेटींचे. नोकरीतलं लक्ष्य गाठाल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. स्पर्धात्मक यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मानसन्मानाचा.
कन्या:
व्यावसायिक समृद्धीचं पर्व वसंतपंचमीचा सप्ताह हृद्य समारोहांचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नववर्षाचं पॅकेज मिळेल. व्यावसायिक समृद्धीचा टप्पा सुरू होत आहे. कर्जमुक्तीचा आनंद घ्याल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना वसंतपंचमी फलदायी. तरुणांना परदेशगमनाची संधी.
तूळ:
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील जीवनातला खरा प्रजासत्ताकदिन साजरा कराल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचा पट अतिशय सुंदर साथ देईल. घरातल्या प्रिय व्यक्तींविषयीच्या सुवार्ता कळतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मौजमजेचा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ जानेवारीचा दिवस अद्वितीय. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
वृश्चिक:
अपयश धुऊन काढाल राशीचा मंगळ ग्रहांचा पट ताब्यात घेणारा वाटतो. एखादं अपयश धुऊन काढाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचे कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लागतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती मौजमजेचा अनुभव सहकुटुंब घेतील. कलाकारांचं स्वप्न साकार होईल. घरातल्या विवाहेच्छूंचे विवाह ठरतील.
धनु:
कोर्टप्रकरण मार्गी लागेल शुभग्रहांच्या पार्श्‍वभूमीवरचं चंद्रबळ वसंतपंचमीच्या या सप्ताहात तुमच्या जीवनात पालवी अंकुरित करेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ ते २६ हे दिवस अतिशय नावीन्यपूर्ण. एखादी दुष्टपरंपरा संपेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना आश्‍वासक ग्रहमान. व्यावसायिक कोर्टप्रकरण मार्गी लागेल.
मकर:
मनासारखं घडत जाईल राशीचं शुक्रभ्रमण प्रजासत्ताकदिनाच्या या सप्ताहात एखादा छुपा अंजेडा अमलात आणेल! ता. २४ ते २६ हे दिवस एकूणच अतिशय प्रवाही. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या मनासारख्या गोष्टी एकामागोमाग एक घडत जातील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मौजमजेचा.
कुंभ:
गुंतवणुकी फलद्रूप होतील दशम्‌ स्थानातल्या मंगळाला गुरुभ्रमणातून प्रचंड ऊर्जा मिळणार आहे. ता. २४ ते २६ हे दिवस पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना बोनस शेअर्स देणारे. मोठे करारमदार होतील. गुंतवणुकी फलद्रूप होतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह वैयक्तिक उत्सव-समारंभांचा. झगमगाटाचा. स्पर्धात्मक यश मिळेल.
मीन:
तरुणांना नोकरीच्या संधी उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती वलयांकित होतील. तरुणांना नोकरीच्या संधी. ता. २३ ची संध्याकाळ वैयक्तिक सुवार्तांची. मित्रसंगतीतून मोठे लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता.२६ व २७ हे दिवस शुभलक्षणी. सतत सुवार्ता मिळतील. घरातल्या विवाहेच्छूंचे विवाह ठरतील. राजकीय व्यक्तीकडून लाभ.

ताज्या बातम्या