ऑस्कर पुरस्कार सोहळा

सोमवार, 5 मार्च 2018

लॉस अँजेलस - हॉलिवूडमधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 90वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला, अभिनेता जिम्मी किमेल यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन केले.

यंदा गईलर्मो डेल टोरोचा 'द शेप ऑफ वॉटर' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले. डार्केस्ट अवर चित्रपटासाठी गॅरी ओल्डमॅन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी चित्रपटातील अभनयासाठी फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय प्रेक्षकांचे लक्ष प्रियांका चोप्राकडे लागले होते. परंतु, आजारी असल्याने आपण यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजर राहू शकले नसल्याचे तीने इन्टाग्रामवर पोस्ट केले आहे.