कंटेनर व ट्रक अडकल्यामुळे ग्रेड सेपरेटरमध्ये वाहतूक कोंडी...

पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये कापसाच्या गाठींनी भरलेला ट्रक अडकला, तर तेथून पाचशे मीटरवर असलेल्या मोरवाडी चौकातील ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. ती सर्व्हिस रोडने वळविण्यात आली. यामुळे बुधवारी (ता. 18) पहाटेपासूनच पिंपरी चौक ते चिंचवड स्टेशन दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. अक्षय तृतीयेच्या दिवशीच हा प्रकार झाल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना व नोकरदारांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेडसेपरेटरमधून जाण्यास साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना बंदी आहे. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com