लबाड कोल्हा....अन्‌ पक्ष्यांची अंडी.


नाशिक ः महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य !...हिवाळ्यात इथं देशी-परदेशी पक्ष्यांचे संमेलन भरते. हिवाळ्या व्यतिरिक्त इथं पर्यटकांचे प्रमाण अल्प असते. पण पावसाळ्यात अनेक पक्ष्यांचा अभ्यास करता येतो.अनेक पक्ष्यांचा पावसाळ्यात विणीचा हंगाम असतो. दोन दिवसांपूर्वी याच अभयारण्यात कोल्हा आणि पक्ष्यांचा लपाछपी..पळापळी पाह्यला मिळाली. पावसाने दमदार हजेरी लावल्याने अभयारण्यात पाणीसाठा मुबलक आहे. त्यामुळे पूर्ण अभयारण्यात टायफा ही वनस्पती पसरलीय.या वनस्पतीमध्ये जांभळी पान कोंबडी, जाकाना, वारकरी, स्पॉट बिल डक आदींसह अनेक पक्षी घरटी बनवितात. आता या घरट्यात अंडी आहेत. दोन दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने या अभयारण्यातील कोल्होबाने खाद्यासाठी आपला मोर्चा टायफा वनस्पतीकडे वळविला. चापडगावजवळील सिमेंटच्या "वॉच टॉवर' शेजारीच "हे महाशय' येवून पोहचले. नर आणि मादी दोघांनी परिसराचा ताबा घेतला. वन्यप्राणी जवळ आल्यावर पक्षी एक संकेत देत असतात. त्यांच्या ओरडण्याने इतर पक्षी सावध होतात. कोल्होबाने टायफामध्ये घुसून पक्ष्यांची अंडी शोधण्यास सुरवात केली. अंडी शोधता-शोधता त्यांनी पक्ष्यांवर देखील हल्ला केला. पक्ष्यांचा आवाज वाढत होता. पक्षी देखील त्यांना इथून हटविण्यासाठी प्रयत्न करीत होते. चार तास हा खेळ सुरु होता. काही पक्ष्यांची अंडी खावून कोल्होबा इथून मार्गस्थ झालेत. हे सारे छायाचित्रबद्ध केलयं आनंद बोरा यांनी... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com