नवरात्रोत्सवाचा आनंद वाढवण्यासाठी टिपऱ्या बनवणारी पारधी कुटूंब दाखल

रविवार, 17 सप्टेंबर 2017

नाशिक - नवरात्रोत्सव जवळ आले की नव नविन, विविध रंगाच्या टिपऱ्या बाजारात दाखल होतात, म्हसोबा पटांगणावर धुळे जिल्ह्यातील टिपऱ्या तयार करणारी कुटूंबेच्या कुटूंबे पोराबाळांसह दाखल झाली आहेत. गेल्या 35 ते 40 वर्षांपासुन ही कुटूंबे व करागीर टिपऱ्यांच्या गाठोढ्यांसह येत असतात. ती यावर्षीही दाखल झाली आहेत

नाशिकला गुजरात जवळ असल्याने नवरात्रोत्सवात टिपऱ्या, रास-गरबा खेळण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे टिपऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. कन्सार या लाकडापासुन ते टिपऱ्या तयार करतात. जंगलातील सरळ लाकुडाचे तुकडे करुन विविध रंगात रंगवले जातात, त्यावर रंगाच्या रेघा मारुन, ते लाकुड रंगात बुडवुन काहीवर रंगीत कागद चिकटवुन आकर्षक टिपऱ्या तयार केल्या जातात. शंभर-शंभराचे गठ्ठे बांधुन त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.