औरंगाबादेत दमदार पाऊस! 

सोमवार, 18 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर रविवारी (ता. 17) रात्री नऊच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. दोन तास दमदार बरसलेल्या सरींनी नागरिकांची दाणादाण उडवली. विजांच्या कडकडाटात सुरू असलेल्या पावसात अनेक भागांत वीज गूल झाली. रिमझिम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची 23.8 मिमी इतकी नोंद झाली.