कागदाची मनगटी घड्याळे 

सैतामा (जपान) - 'पेपर क्विलिंग'ची कलाकुसर आपल्या सगळ्यांना माहित असेल. कागदापासुन केलेले दागिने, छोट्या बाहुल्या आपण बघितल्याही असतील. जपानमधील मनाबु कोसाका या कलालाकाराने मात्र कागदापासून मनगटी घड्याळाच्या हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या आहेत.  

चांगल्या प्रतीच्या 'केंट' कागदापासून ही घड्याळे त्यांनी तयार केली आहेत. या प्रकारचा कागद मुख्यत्वे 'पॅकेजिंग'च्या क्षेत्रात वापरला जातो. कोसाका यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रोलेक्स' आणि 'कॅसिओ' कंपनिच्या मनगटी घड्याळ्यांच्या प्रतिकृती त्यांनी तयार केल्या आहेत. या विषयी बोलताना ते म्हणाले ''या प्रतिकृती तयार करताना आपण '3डी प्रिंटरचा' वापर केला का असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. परंतु, मी या सर्व प्रतिकृती हातानेच घडविल्या आहेत'' यासाठी डिंक, छोटे ड्रिल, काही कोरिव काम करण्यासाठीची अवजारे याचा वापर केला असल्याचे कोसाका सांगतात.  

सोशल मिडियावर या घडाळ्यांच्या फोटोंचे चांगलेच कौतुक होत असून, कोसाकांना या सुंदर प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्याचा आग्रह होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

फोटो सौजन्य : Manabu Kosaka facebook pege

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com