Ashok Saraf Birthday : हिंदी नकोच! मराठी चित्रपटांची धरली वाट, झाले मोठे स्टार

मराठी - हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेते विनोदाचे बादशहा अशोक सराफ चाहत्य़ांच्या नेहमीच चर्चेत असतात.
Ashok Saraf Interesting facts about the actor king of comedy
Ashok Saraf Interesting facts about the actor king of comedy esakal

Ashok Saraf - मराठी - हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेते विनोदाचे बादशहा अशोक सराफ चाहत्य़ांच्या नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या (marathi hindi cinema) वेगवेगळ्या मुलाखती सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. अशोक सराफ हे मराठी चित्रपट विश्वात अशोक (Marathi movie) मामा या नावानं प्रसिद्ध आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं आपण त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून (Marathi Entertainment) घेणार आहोत. आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं अशोक सराफ यांनी नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रंगभूमीवरही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या अशोक मामांना प्रेक्षकांकडून अमाप लोकप्रियता मिळाली. अभिनयातील वेगवेगळे पुरस्कारही अशोक सराफ यांना मिळाले आहेत.एक डाव भुताचा, धुमधडाका, गंमत जंमत, अशीही बनवाबनवी, बिनकामाचा नवरा, एक गाव बारा भानगडी, पांडु हवालदार यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय त्यांनी करण अर्जुन, येस बॉस या हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com