Photo l नयनरम्य आतषबाजी ; चंदेरी झगमगाटात अंबाबाईचा रथोत्सव!

यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय हा सोहळा झाल्याने कोल्हापूरकरांनी अलोट गर्दी केली.
kolhapur
kolhapuresakal

कोल्हापूर: "अंबा माता की जय' असा टिपेला पोचलेला जयघोष, करवीर नाद ढोलताशा पथकाचा ठेका, ब्रास बॅंडची सुरावट, गुलालाची उधळण, नयनरम्य आतषबाजी, विविधरंगी प्रकाशझोतांनी उजळून निघालेल्या रथोत्सव मार्गावर रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, रथावर पृष्पवृष्टी करण्यासाठी आसुसलेली मनं, अशा सळसळत्या उत्साहात आज श्री अंबाबाईचा रथोत्सव साजरा झाला. कोल्हापूरकरांचा लोकोत्सव म्हणजे काय असतो, याची प्रचीती यंदाही या सोहळ्याने दिली. दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्षे या सोहळ्यावर निर्बंध होते. मात्र, यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय हा सोहळा झाल्याने कोल्हापूरकरांनी अलोट गर्दी केली. याचे संकरलन केले आहे छायाचित्रकार-बी.डी.चेचर यांनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com