'मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल होईपर्यंत पोलिस स्टेशनसमोरून हलणार नाही'

मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल करण्‍यास पोलिसांचा नकार असल्याने मी या घटनेचा निषेध करतो
समरजितसिंह घाटगे
समरजितसिंह घाटगेesakal
Updated on
Summary

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा उद्या निकाल आहे. या पार्श्वभूमीप कोल्हापूरचे राजकारण चांगलचं तापलं आहे. कागलमधील भाजप नेते समरजितसिंह घाटगे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वादामुळे राजकारणात अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशन समोरून हालणार नाही अशी भूमिका भाजपाचे समरजितसिंह घाटगे यांनी घेतली असून मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल करण्‍यास पोलिसांचा नकार असल्याने मी या घटनेचा निषेध करतो असेही ते म्हणाले आहेत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांची तक्रार पोलीसांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याने कागल पोलिस ठाण्यासमोर वातावरण तणावपूर्ण बनले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांची तक्रार पोलीसांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याने कागल पोलिस ठाण्यासमोर वातावरण तणावपूर्ण बनले.esakal
जोपर्यंत तक्रार दाखल करून घेतली जात नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा समरजितसिंह घाटगे यांनी घेतला. शंभर कोटीचे अब्रूनुकसानीचे दावे लगेच दाखल होतात पण हा गुन्हा दाखल होत नाही. पोलिस प्रशासन दबावाखाली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
जोपर्यंत तक्रार दाखल करून घेतली जात नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा समरजितसिंह घाटगे यांनी घेतला. शंभर कोटीचे अब्रूनुकसानीचे दावे लगेच दाखल होतात पण हा गुन्हा दाखल होत नाही. पोलिस प्रशासन दबावाखाली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.esakal
गोकुळ दूध संघामध्ये मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद हे संचालक आहेत. वाढदिवसाच्या पुरवणीमध्ये गोकुळ दूध संघाने दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावात काही अक्षरांचा वापर करून 'राम' असा एकेरी उल्लेख केला आहे.
गोकुळ दूध संघामध्ये मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद हे संचालक आहेत. वाढदिवसाच्या पुरवणीमध्ये गोकुळ दूध संघाने दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावात काही अक्षरांचा वापर करून 'राम' असा एकेरी उल्लेख केला आहे. esakal
मंत्री मुश्रीफ हे सोन्याचा खंजीर घेऊन जन्माला आले आहेत. त्यांना बोट धरून राजकारणात आणलेल्या स्व. राजे विक्रमसिंह घाटगे व आपला वारसा बाजूला ठेवून त्यांना आमदार केलेल्या स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला आहे.
मंत्री मुश्रीफ हे सोन्याचा खंजीर घेऊन जन्माला आले आहेत. त्यांना बोट धरून राजकारणात आणलेल्या स्व. राजे विक्रमसिंह घाटगे व आपला वारसा बाजूला ठेवून त्यांना आमदार केलेल्या स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला आहे. esakal
स्वर्गीय मंडलिक साहेब यांना तर त्यांनी वाळलेले पान आणि म्हातारा असे संबोधले होते. माझा विरोध साहेबांना नाही त्यांच्या प्रवृत्तीला आहे. बहुजनांमध्ये सहनशीलता आहे पण प्रभू रामचंद्रांची थट्टा कधीही खपवून घेणार नाही. असे ते म्हणाले.
स्वर्गीय मंडलिक साहेब यांना तर त्यांनी वाळलेले पान आणि म्हातारा असे संबोधले होते. माझा विरोध साहेबांना नाही त्यांच्या प्रवृत्तीला आहे. बहुजनांमध्ये सहनशीलता आहे पण प्रभू रामचंद्रांची थट्टा कधीही खपवून घेणार नाही. असे ते म्हणाले.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com