अमळनेरच्या 15 विद्यार्थ्यांची MNC IT कंपन्यांमध्ये निवड

या विद्यार्थांना मिळणार चांगल्या वार्षिक पगारासोबतच आकर्षक सुविधा
अमळनेरच्या 15 विद्यार्थ्यांची MNC IT कंपन्यांमध्ये निवड
SYSTEM

अमळनेर (जि. जळगाव) : येथील प्रताप महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील बी. एस्सी. तसेच एम. एस्सी.च्या अंतिम वर्षांतील १५ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय आय. टी. कंपन्यांमध्ये ऑफ ‘कॅम्पस ड्राईव्ह’द्वारे निवड झालेली आहे. या विद्यार्थांना चांगल्या वार्षिक पगारासोबतच आकर्षक सुविधा पुरविली जाणार आहे. यातील विप्रो सॉफ्टवेअर कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे पदव्युत्तर (एम. टेक) शिक्षणासाठी देखील संधी उपलब्ध होणार आहे.

प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही ‘कॅम्पस ड्राईव्ह’ ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात आली. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी या माध्यमातून उपलब्ध झाल्याने त्यांचे खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. वाघ, उपप्राचार्य डॉ. जी. एच. निकुंभ, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ. जे. बी. पटवर्धन, ‘आयक्यूएसी’चे समन्वयक डॉ. जयेश गुजराथी, प्रा. ए. एन. शिंदे, प्रा. तृप्ती चौधरी, प्रा. वैष्णवी साळुंखे, प्रा. भाग्यश्री सपकाळे, प्रा. नम्रता बडगुजर, प्रा. श्वेता पाटील, प्रा. किरण बोरसे यांनी अभिनंदन केले. या ‘कॅम्पस ड्राईव्ह’साठी विविध स्तरावर विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पुष्पा पाटील व प्रा. नेहा आगलावे यांचे मार्गदर्शन लाभले.

अमळनेरच्या 15 विद्यार्थ्यांची MNC IT कंपन्यांमध्ये निवड
क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातींना भुलू नका, सावध राहा

यांची झाली निवड

महाविद्यालयाच्या वैष्णवी साळुंखे हिची विप्रो लिमिटेड कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनिअर म्हणून तर धनश्री शेंडे हिची ‘टीसीएस’ कंपनीमध्ये सिस्टम ऑडमिनीस्ट्रेटर म्हणून निवड झाली. याशिवाय कमलेश महाजन, संजना भंडारी, वैशाली पाटील व करिष्मा पाटील या विद्यार्थ्यांची ‘टीसीएस’मध्ये असिस्टंट सिस्टम इंजिनिअर, रुपेश ठाकूर, नेहा न्हावी, रितेश जैन, भावेश महाजन व भूषण सोनवणे यांची विप्रो लिमिटेडमध्ये स्कॉलर ट्रेनी, अश्विनी भदाणे या विद्यार्थिनीची ‘टीसीएस’ कंपनीत ग्रॅज्युएट ट्रेनी, अनुष्का ठाकरे हिची ‘एम्फोसीस’ कंपनीत ट्रेनी असोसिएट सॉफ्टवेअर तर गौरव पाटील व विशाल पाटील यांची कॅपजेमिनी कंपनीत ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून निवड करण्यात आली. विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्य सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

अमळनेरच्या 15 विद्यार्थ्यांची MNC IT कंपन्यांमध्ये निवड
Weather updates : उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता कमीच; आयएमडीचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com